jennifer Arcuri claims Boris Johnson’s wife almost caught them after they had sex in his family home
पत्नी पकडणारच होती, बोरिस जॉन्सनसोबत त्यांच्या घरातच रोमान्स; अमेरिकन बिझनेस वुमनचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:02 PM1 / 11अमेरिकेच्या बिझनेस वुमन जेनिफर आरक्यूरी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे लग्न झालेले असतानाही तिच्यासोबत चार वर्षे प्रेमसंबंधात होते. जेनिफर यांनी मिरर वेबसाईटकडे हा खळबळजनक दावा केला आहे. (The US businesswoman, 36, who says she had a steamy four-year affair with Johnson, said she left ten minutes before then-wife Marina returned home to the couple's £3.35million townhouse in North London.)2 / 11जेनिफर यांनी सांगितले की, बोरिस यांच्यासोबत त्यांच्या घरी त्यांची पत्नी नसताना शारिरीक संबंध ठेवले आहेत. या काळात दोघेही विवाहित होते. बोरिस यांची पत्नी मरिना तेव्हा कामानिमित्त घराबाहेर असायची. मी तिथे गेल्यानंतर काही वेळाने ती आली होती. 3 / 11महत्वाचे म्हणजे बोरिस तेव्हा लंडनचे महापौर होते. त्यांनी तेव्हा आइलंगटनमधील 3.5 दशलक्ष्य पाउंड्स किंमतीच्या त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. बोरिस यांच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याआधी दोघांनी शेक्सपिअरचे पुस्तक वाचले होते. बोरिस यांच्या घरी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर विचित्र वाटत होते, असे जेनिफर यांनी सांगितले. 4 / 11बोरिस यांना पहिल्यांदा 2011 मध्ये भेटल्याचे जेनिफर यांनी सांगितले. तेव्हा त्या बिझनेस स्टुडंट होत्या. बोरिस तेव्हा एका कार्यक्रमाला आले होते. बोरिस यांच्यावर तेव्हाच जेनिफर भाळल्या होत्या. 5 / 112012 मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. हे नाते चार वर्षे टिकले. तू पहिली अशी अमेरिकन तरुणी आहेस जिच्यावर मी आकर्षित झालोय, असे बोरिस म्हणालेल्याचे जेनिफर यांनी सांगितले. 6 / 11मार्च 2016 मध्ये आम्ही बोरिस यांच्या पुस्तकावरील काही भागावर चर्चा करत होतो. बोरिस यांनी तेव्हा लेखकासोबत विसंवाद झाल्याचे सांगतिले होते. तसेच ते त्यांच्या पुस्तकावरून संभ्रमात असल्याचे म्हणाले. 7 / 11यामुळे आम्ही दोघांनी शेक्सपिअरचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्याचवेळी आम्हा दोघांमध्ये रोमान्स सुरु झाल्याचे जेनिफर म्हणाल्या. 8 / 11मी त्यांच्या घरी जाण्याआधी बोरिस चीज पास्ता तयार करत होते. दोन ग्लासांमध्ये रेड वाईनही ओतली होती. त्यांना घरातील काही वस्तू संपल्याचे लक्षात येताच ते दुकानात ते आणण्यासाठी गेले होते. 9 / 11बोरिस यांनी मला एकटेच घरात ठेवले होते. ही वेळ माझ्यासाठी खूप विचित्र होती. यानंतर मी त्यांच्या किचनमध्ये सेल्फीदेखील घेतला, असे त्या म्हणाल्या.10 / 11बोरिस यांनी किचनपासून दूरच रहावे, ते चांगले आहे. ते आपले पायमोजे शोधू शकत नाहीत, जेवण बनविणे कतर दूरच. हा व्यक्ती किचनमधील काहीच कामाचा नाही. त्यांनी बनविलेला पास्तादेखील खाण्यालायक नव्हता, असे त्या म्हणाल्या. 11 / 11जेनिफर यांनी या वेबसाईटला काही पुरावे दिले आहेत. यामध्ये त्यांनी बोरिस यांना केलेले मेसेज दिले आहेत. पत्नीला दुसरे कोणी आल्याचा संशय येऊ नये म्हणून जेनिफर यांनी घरातून निघून गेल्यावर भांडी नीट धुण्याचा मेसेज केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications