Joe Biden accidentally paid Russian prostitute 25000 dollar for son hunter
जेव्हा ज्यो बायडेन यांच्या मुलाने कॉल गर्लला केलं होतं १८ लाख रूपयांचं पेमेंट, एका लॅपटॉपमुळे झाला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:29 AM1 / 10अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेनने २०१८ साली एका कॉल गर्लसोबत हॉटेलमध्ये रात्र घालवली होती. आणि कदाचित नकळत याची किंमत त्याच्या वडिलांना चुकवावी लागली होती. याचा दावा अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क पोस्टने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये केला आहे. 2 / 10न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये हॉलिवूडच्या चेटो मारमोंट हॉटेलमध्ये एका कॉल गर्लसोबत रात्र घालवल्यानंतर हंटरने नकळत आपल्या वडिलांच्या अकाऊंटमधून तिला पेमेंट केलं होतं.3 / 10हंटर बायडेनच्या लॅपटॉपमधून अनेक मेसेज, फोटो आणि पैशांच्या देवाण-घेवाणीची माहिती मिळाली आहे. रिपोर्टनुसार, या लॅपटॉपचा वापर हंटर बायडेन एका डायरीप्रमाणे करत होता. या लॅपटॉपमध्ये हंटर बायडेनचे ई-मेल, चॅंटीग, आर्थिक उलाढाली आणि त्याचा सेल्फी होता. एक वर्षानंतर हंटरने हा लॅपटॉप दुरूस्तीसाठी दिला होता. त्यानंतर तो विसरून गेला होता.4 / 10रिपोर्टनुसार, २०१८ च्या मे महिन्यात ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेनने एका प्रवासादरम्यान कॉल गर्लसोबत हॉटेलमध्ये वेळ घालवला होता. न्यूयॉर्क पोस्टने कागदपत्रांच्या आधारावर दावा केला आहे की, हंटर बायडेनने आपली आवडती वेबसाइट एमराल्ड फॅंटसी गर्लवरून आपल्यासाठी एक रशियन-हिरव्या डोळ्यांची मुलगी निवडली होती. तिच्यासोबत त्याने रात्र घालवली. महिलेचं नाव याना होतं.5 / 10आता प्रश्न हे उपस्थित होत आहे की, अखेर कशा स्थितीत हंटर बायडेन आणि त्याचे वडील ज्यो बायडेन यांच्आ आर्थिक देवाण-घेवाणीत गडबड झाली होती? एकूण २५ हजार डॉलर म्हणजे साधारण १८ लाख रूपयांचं पेमेंट केलं गेलं होतं. जे मेसेजचे स्क्रीनशॉट लॅपटॉपमधून न्यूयॉर्क पोस्टला मिळाले आहेत. त्यानुसार हंटरने रशियन महिलेला आपलं नाव रोब सांगितलं होतं. मेसेजमध्ये लिहिलं आहे की, 'हाय, माझं नाव रोब आहे. मी चेटो मारमोंटमध्ये थांबलो आहे. तू उपलब्ध आहेस का?6 / 10न्यूयॉर्क पोस्टनुसार हॉटेलमध्ये थांबण्यादरम्यान दोघांनी संबंध ठेवले, मद्यसेवन केलं आणि अश्लील व्हिडीओही बनवला. रिपोर्टनुसार, बायडेन यांचा मुलगा हंटरने २४ मे २०१८ ला गुलनोरा नावाच्या एका महिलेला संपर्क केला होता. ती एमराल्ड फॅंटन्सी गर्ल्ससाठी एजंटचं काम करत होती. तिला एका अॅपद्वारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं कार्ड काम करत नव्हतं.7 / 10सकाळपर्यंत हीच अडचण येत होती आणि त्याच्या कार्डने केलेलं पेमेंट कॅन्सल झालं होतं. न्यूयॉर्क पोस्टनुसार, लॅपटॉपमधून मिळालेल्या रिसिप्टनुसार, आधी ८ हजार डॉलर आणि नंतर २ हजार डॉलरचं आणखी एक ट्रान्सफर करण्यात आलं. नंतर सकाळी ११ वाजता पुन्हा ३५०० डॉलर, नंतर ८ हजार डॉलर आणि पुन्हा ३५०० डॉलरचे वेगवेगळे पेमेंट लॅपटॉपच्या माध्यमातून केलं.8 / 10एकूण २५ हजार डॉलरचं पेमेंट करण्यात आलं. यानंतर हंटरने एका व्यक्तीला संपर्क केला आणि दावा केला होता की, त्यांना राहिलेले पैसे मिळतील. नंतर या व्यक्ती ओळख रॉबर्ट सॅवेज म्हणून पटली होती. तो माजी सीक्रेट एजंट होता.9 / 10न्यूयॉर्क पोस्टनुसार, त्यानंतर कॉलगर्लने बायडेनला मेसेज करून सांगितलं की, 'माझ्या खात्यात काही पैसे आलेत. गेल्यारात्री ८ हजार, ८ हजार, ३५०० डॉलर. महिलेने मेसेजमध्ये पुढे लिहिले की, 'मला माझ्या खात्यात ही रक्कम बघून आनंद झाला. चिंता करण्याची गरज नाही. बाकीचे पैसे तुम्ही परत घेऊ शकता. 10 / 10हंटर आणि त्या महिलेत नंतर पुढे काय बोलणं झालं याची माहिती नाही. यानाचा सेलफोन बंद झाला आहे आणि एमराल्ड फॅंटन्सी गर्ल्स वेबसाइटही बंद झाली आहे. यानाचे वकिल क्रिस अर्मेंटा यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. हंटर बायडेनच्या वकिलांनी यावर काहीच रिप्लाय दिला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications