Joe Biden Good News For Indians Living In Us Propose Citizenship Path For Immigrants
भारतीयांसाठी खूषखबर! बायडन अमेरिकेचे अध्यक्ष होताच पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेणार By कुणाल गवाणकर | Published: January 19, 2021 5:21 PM1 / 10अमेरिकन अध्यक्ष पदाच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारे डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार आहेत.2 / 10अध्यक्ष पदाच्या लढतीत ट्रम्प यांना चीतपट करणाऱ्या बायडन यांनी निवडणूक प्रचारात विद्यमान सरकारच्या इमिग्रेशन धोरणावर कडाडून टीका केली होती. 3 / 10आता अध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ज्यो बायडन पहिल्याच दिवशी इमिग्रेशन विधेयक मांडण्याची योजना आखत आहेत. 4 / 10नव्या विधेयकामुळे देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १ कोटी १० लाख लोकांना आठ वर्षांसाठी नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या १ कोटी १० लाखांमध्ये जवळपास ५ लाख भारतीयांचा समावेश आहे.5 / 10ट्रम्प यांचं इमिग्रेशन धोरण अतिशय कठोर होतं. मात्र बायडन यांचं धोरण त्याच्या अगदी विरुद्ध आहे.6 / 10बायडन बुधवारी अध्यक्ष पदाची शपथ घेतील आणि त्यानंतर लगेचच विधेयक मांडतील, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.7 / 10ट्रम्प यांचं इमिग्रेशन धोरण अमेरिकेच्या मुल्ल्यांवर कठोर हल्ला करणारं असून सत्तेत येताच या नुकसानाची भरपाई करू, असं आश्वासन बायडन यांनी प्रचारादरम्यान दिलं होतं.8 / 10नव्या विधेयकामुळे १ जानेवारी २०२१ पर्यंत अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल. ते कर भरत असल्यास आणि इतर आवश्यक निकषांची पूर्तता करत असल्यास त्यांना पाच वर्षांसाठी अस्थायी कायदेशीर दर्जा देण्याचा मार्ग प्रशस्त होईल किंवा त्यांना ग्रीन कार्ड मिळेल.9 / 10अनेक मुस्लिम देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. तोदेखील बायडन यांच्याकडून बदलला जाण्याची शक्यता आहे.10 / 10अमेरिकेतल्या १.१ कोटी अवैध प्रवाशांना वैध दर्जा देऊ, असं आश्वासन बायडन यांनी दिलं होतं. अमेरिकेतल्या अवैध भारतीय प्रवाशांची संख्या ५ लाख इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications