Joe Biden, the son of a factory furnace cleaner become president of america
Joe Biden : संघर्षमय प्रवास… कारखान्यातील भट्टी सफाई कामगाराचा मुलगा ते व्हाईट हाऊस By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 5:44 PM1 / 12जो बायडन हे नाव आता संपूर्ण जगाला परिचयाचे बनले आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्यापासून जो बायडन केवळ 1 पाऊल दूर आहेत. 2 / 12बायडन यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या प्रमुखाचा मान मिळवला आहे. 3 / 12जोसेफ रॉबिनेट बाइडेन जूनियर असे जो बायडन यांचे पूर्ण नाव असून 20 नोव्हेंबर 1942 साली पेनसिल्वेनिया राज्यातील स्क्रॅटेन येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जोसेफ बायडने हे एका मोठ्या कारखान्यात भट्टी साफ करण्याचं काम करत. 4 / 12तसेच, सेकंड हँड म्हणजेच जुन्या चारचाकी गाड्यांची विक्री करण्याचं कामही जोसेफ बायडन करत, त्यामुळे साहजिकच बायडन यांची घरची परिस्थिती समृद्ध किंवा श्रीमंत नव्हती. 5 / 12जो बायडन यांना घरच्या परिस्थितीमुळेच शालेय जीवनातच कामाला सुरुवात करावी लागली. ते शाळेतील खिडक्या साफ-सफाईचं काम करत. तसेच बागिचांमध्ये बागकाम करुन ते आपल्या शाळेचा खर्च भागवत होते. 6 / 12बायडन यांनी अतिशय संघर्षपूर्ण परिस्थितीतून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली, आपल्या पूर्व परिस्थितीची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच, प्रत्येक ठिकाणी ते नागरिकांच्या हितासाठी संघर्ष करत आले आहेत. 7 / 12डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी गुरुवारी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेत २७० हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू केली. व्हाइट हाऊसपर्यंत पोहचण्यासाठी बायडन यांना आता अवघ्या सहा प्रातिनिधिक मतांची (इलेक्टोरल व्होट्स) आवश्यकता आहे. 8 / 12बायडन यांना मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने बायडन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. 9 / 12गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बायडन यांना २६४ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट्स मिळाल्याचे स्पष्ट झाले. ३ नोव्हेंबरला अखेरचे मतदान झाल्यानंतर अमेरिकेत मतमोजणी सुरू आहे. 10 / 12बुधवारी बायडन आणि ट्रम्प यांना मिळालेल्या प्रातिनिधिक मतांमध्ये अनुक्रमे २३८ आणि २१३ असा फरक होता. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा, अरिझोना, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या सात राज्यांमधून काय निकाल येतो, याकडे लागले होते. 11 / 12गुरुवारी यापैकी मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी बायडन यांना पसंती दिल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. 12 / 12पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, या राज्यांपैकी जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांमध्येही बायडन पिछाडी भरून काढत असल्याचे चित्र आहे आणखी वाचा Subscribe to Notifications