जो बायडन यांचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानात पुन्हा अमेरिकेचे सैन्य पाठवणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 10:41 AM
1 / 10 आताच्या घडीला तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. 2 / 10 तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात पाय पसरत असून, काही जणांच्या मते देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे. कंदाहारमध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय छायाचित्रकार दानिशची तालिबानने हत्या केली होती. 3 / 10 या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका पुन्हा एकदा आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये पाठवणार आहे. बायडन प्रशासनातील एका अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 4 / 10 तालिबानकडून एकेक करत अफगाणिस्तानधील मोठे भाग ताब्यात घेण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी थेट सैन्याला पाचारण करण्यात येणार आहे. 5 / 10 पेंटागनच्या जॉन किर्बी यांनी सांगितले की, काबुल येथील दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय अमेरिकेचे सैन्य पाठवणार आहे. यामध्ये ३ हजार सैनिकांचा समावेळ असेल. तसेच अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या नागरिकांना मायदेशात परतण्यास कोणतीही आडकाठी करण्यात आल्यास सैन्य तातडीने त्यावर अॅक्शन घेईल, असेही त्यांनी नमूद केले. 6 / 10 एवढेच नव्हे, तर ब्रिटनही आपल्या नागरिकांना सहीसलामत अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी ६ हजार सैनिकांना पाठवणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले. 7 / 10 तालिबानने शुक्रवारी दावा केला की त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंदाहार ताब्यात घेतले आहे. आता फक्त राजधानी काबूल शिल्लक आहे. काबुलनंतर कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे. 8 / 10 अफगाणिस्तानवर तालिबानची पकड हळूहळू मजबूत होत आहे. तालिबानचे पुढील लक्ष्य काबूल असेल. तालिबानने कंदाहारवर ताबा मिळवण्यापूर्वी आणखी दोन प्रांतीय राजधानी गझनी आणि हेरातवर ताबा मिळवला. तालिबान काबूलपासून अवघ्या १३० किमी अंतरावर आहेत. 9 / 10 अशाप्रकारे, दहशतवादी संघटनेने आतापर्यंत १२ प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. दोन स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराबाहेरील लष्करी आणि गुप्तचर तळावर अजूनही तुरळक लढाई सुरू आहे. 10 / 10 अशावेळी लढण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे काय हे अफगाणी नेतृत्वाला ठरवायचे असल्याचे व्हाइट हाऊसने सांगितले. गेली दोन दशके आपण ज्यांना प्रशिक्षण दिले, त्या अफगाणी राष्ट्रीय दलांजवळ लढण्यासाठी क्षमता आणि युद्धसाहित्य असल्याचे बायडेन प्रशासनाने सांगितले. आणखी वाचा