शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुरावा आहे बॉस; 'या' आहेत जगातल्या 10 सगळ्यात सुंदर तरुणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 3:01 PM

1 / 11
लंडनमधील सेंटर फॉर अ‍ॅडवान्स फेशियल कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीची एमडी जूलियन डी सिल्वा यांनी जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी तयार केली आहे. यामध्ये कॉम्प्यूटरराइस फेशियल मॅपिंगच्या आधाराने परफेक्ट फेस रेशियोद्वारे सुंदर चेहऱ्याची माहिती प्राप्त होऊ शकते असं जूलियन डी सिल्वाने सांगितले. तसेच जूलियनने फेशियल मॅपिंगचा पुरावा देत जगातील सर्वात सुंदर असलेल्या महिलांची यादी तयार केली आहे.
2 / 11
ब्रिटेनची मॉडल, अभिनेत्री आणि गायिका कारा डिलेविंगने या यादित 10 व्या स्थानावर आहे. जूलियनच्या गोल्डन रेशियो स्कोर्समध्ये कारा डिलेविंगला 89.99 टक्के गुण देण्यात आले आहे.
3 / 11
रोर आणि डार्क हॉर्स या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अमेरिकेची गायिका कैटी पेरी जगातील सुंदर महिलांच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहे. जूलियन गोल्डन रेशियोमध्ये तिला 90.08 टक्के गुण देण्यात आले आहे.
4 / 11
अमेरिका आणि इस्राइल देशाची नागरिकता प्राप्त करणारी अमेरिकेची अभिनेत्री नताली पोर्टमैन या यादीत 8व्या क्रमांकावर आहे. नताली पोर्टमैनला 90.51 टक्के गुण देण्यात आले आहे.
5 / 11
एवेंजर्स आणि लूसी सारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम करणारी अमेरिकेची अभिनेत्री स्कारलेट जॉन्सन जगातील सुंदर महिलांच्या यादीत 7व्या क्रमांकावर आहे. तिला 90.91 टक्के गुण देण्यात आले आहे.
6 / 11
मॉडलिंगनंतर व्यवसायमध्ये पर्दापण करणारी ब्रिटेनची केट मॉस 6व्या क्रमांकावर असून तिला 91.05 टक्के गुण देण्यात आले आहे.
7 / 11
अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट देखील सुंदर महिलांच्या यादीत 5व्या क्रमांकावर आहे. टेलर स्विफ्टला 91.64 टक्के गुण देण्यात आले आहे.
8 / 11
अमेरिकेची अजून एक प्रसिद्ध गायिका एरियाना ग्रांडे चौथ्या क्रमांकावर असून तिला 91.81 टक्के गुण देण्यात आले आहे.
9 / 11
अमेरिकेची मॉडल आणि अभिनेत्री एंबर हर्ड जगातील सुंदर महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एंबर हर्डला 91.85 टक्के गुण देण्यात आले आहे.
10 / 11
अमेरिकेमधील गायिका बियोंस दूसऱ्या क्रमांकावर असून तिला 92.44 टक्के गुण देण्यात आले आहे.
11 / 11
जूलियन गोल्डन रेशियो स्कोर्सच्या सर्वेक्षणामध्ये जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत अमेरिकेमधील मॉडल बेला हदीद हिला पहिले स्थान देण्यात आले आहे. बेला हदीदला सर्वात जास्त 94.35 टक्के गुण मिळाले आहे.
टॅग्स :WomenमहिलाInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका