शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Juliet Rose : १५ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर फुललं जगातील सर्वांत महागडं गुलाब, किंमत फक्त ११२ कोटी रुपये, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 4:03 PM

1 / 6
जगभरात गुलाबाच्या हजारो प्रजाती आहेत. मात्र त्यामधील एक गुलाब असं आहे जे त्याचं सौंदर्य आणि सुवासामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. हे गुलाब एवढं खास आहे की, त्याची गणना जगातील सर्वात महागड्या गुलाबामध्ये होते. या गुलाबाची काही खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
2 / 6
फायनान्स ऑनलाईनने दिलेल्या माहितीनुसार एक ज्युलिएट गुलाबाची किंमत तब्बल ११२ कोटी रुपये असते. हे गुलाब एवढं महाग असण्याचं कारण म्हणजे या गुलाबाची शेती करणं खूप मेहनतीचं काम आहे. ज्युलिएट गुलाब हे पहिल्यांदा २००६ मध्ये समोर आणण्यात आलं होतं.
3 / 6
गुलााबवर प्रयोग आणि त्याची शेती करणाऱ्या डेव्हिड ऑस्टिन यांनी हे गुलाब खास पद्धतीने रुजवले होते. डेव्हिड यांनी अनेक पद्धतीच्या गुलाबांचा संकर करून या नव्या पद्धतीच्या गुलाबाचं फूल तयार केलं आहे. त्याला ज्युलिएट रोझ असं नाव दिलं आहे.
4 / 6
मात्र या गुलाबाला तयार करणं तितकंही सोपं नव्हतं. पोलन नेशनचा अहवाल सांगतो की. ज्युलिएट गुलाब फुलवण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा वेळ लागला. या खास पद्धतीच्या गुलाबाला एप्रिकोट-ह्युड हायब्रिड असं नाव देण्यात आलं आहे. डेव्हिडने २००६ मध्ये जे पहिले ज्युलिएट गुलाब तयार केलं होतं. त्याची किंमत ९० कोटी रुपये एवढी होती.
5 / 6
या गुलाबाचा सुगंधही खास असा आहे. डेव्हिड ऑस्टिन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या गुलाबाच्या सुगंधाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार या गुलाबाचा सुगंध हा सौम्य आहे. तो परफ्युमप्रमाणे भासतो. तसेच तो लोकांना खूप आवडतो. या गुलाबाच्या सर्व वैशिष्ट्यांमध्ये या गुलाबाच्या सुगंधाची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. या गुलाबाचा सुगंध त्याला इतर गुलाबांपेक्षा वेगळा बनवतो.
6 / 6
हे गुलाब आपला खास पद्धतीचा सुगंध आणि रचनेमुळे नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरते. मुघलकाळापासून आजपर्यंत गुलाबाला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. मात्र गुलाबामध्ये अशी काही वैशिष्ट्ये असतात की, ज्यामुळे त्याचा वापर हा सौंदर्य प्रशासनामध्येही केला जातो.
टॅग्स :FlowerफुलंJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय