Kabul Bomb Blast: ड्रोनचा अचूक निशाणा आणि काबुल ब्लास्टचा मास्टमाईंड लपलेल्या घराच्या उडाल्या ठिकऱ्या, समोर आले अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 1:32 PM
1 / 7 काबुल विमानतळावर ISIS-K च्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर अमेरिकेने काही तास उलटण्याआधीच जबरदस्त कारवाई करत प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेच्या लष्कराने ड्रोनच्या माध्यमातून एअरस्ट्राईक करत ISIS-K च्या दहशतवाद्यांवर प्रहार केला आहे. यामध्ये अमेरिकेने ISIS-K च्या मास्टरमाईंडचा खात्मा केला. 2 / 7 या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून एक औपचारिक वक्तव्यही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये टार्गेटला ठार करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यात कुठल्याही सामान्य नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच अमेरिकेने केलेल्या या एअरस्ट्राईकचे काही फोटोही समोर आले आहेत. यामधून हा हल्ला किती भयावह होता आणि त्यामधून दहशतवाद्यांना किती आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले हे समोर आले आहे. 3 / 7 एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने काल रात्री उशिरा १२ वाजता पूर्व नंगरहारमधील एका घरावर स्फोटकांनी सज्ज अशा ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तसेच तिथे ठेवण्यात आलेल्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. 4 / 7 हा हल्ला इकता भीषण होता की, त्यामुळे घर असलेल्या जमिनीच्या भागात एक मोठा खड्डा तयार झाला. तसेच घराच्या भिंतींना जागोजागी छिद्रे पडलेली दिसत आहेत. तसेच जमिनीलाही भेगा गेल्या आहेत. 5 / 7 आता या हल्ल्यामधून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या हल्ल्यात काबुल बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंडही मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या ड्रोन हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले हा आकडा समोर आलेला नाही. 6 / 7 गुरुवारी काबुल विमानतळाबाहेर साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात अमेरिकेच्या १३ सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून प्रत्युत्तरदाखल कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. 7 / 7 या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अमेरिकन सैन्याने आता ही कारवाई केली आहे. आणखी वाचा