शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पतीला एका ब्लाइंड डेटवर भेटल्या होत्या कमला हॅरिस, ते काय करतात आणि किती आहे त्यांची संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 11:05 AM

1 / 12
जो बायडन यांनी बुधवारी अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक शपथ घेतली. त्यासोबत कमला हॅरिस यांनी देशातील पहिल्या महिलेच्या रूपात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. मूळची चेन्नई असलेली आई आणि जमैकातील आफ्रिकन वडिलांची ५६ वर्षीय मुलगी कमला हॅरिस यांनी देशातील पहिली महिला उपराष्ट्राध्यक्ष बनून इतिहास रचला आहे.
2 / 12
कमला हॅरिससोबतच त्यांचे पती डगलस एमहॉफ यांनीही इतिहास रचला आहे. ते अमेरिकेचे 'सेकंड जंटलमॅन' बनले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतही चांगलीच चर्चा रंगली आहे. चला तर मग जाणून घेऊ कमला हॅरिस यांचे पती कोण आहेत आणि ते काय करतात?
3 / 12
कमला हॅरिस यांनी २२ ऑगस्ट २०१४ मध्ये कॅलिफोर्नियाच्या सांता बारबरामध्ये डगलस एमहॉफ यांच्यासोबत लग्न केलं होतं. ५६ वर्षीय डगलस हे २०१७ मध्ये डीएलए पायपर फर्मसोबत जोडले गेले आणि ते एक एंटरटेन्मेंट लॉयर आहेत.
4 / 12
ते मीडिया सेक्टरमध्ये एंटरटेनमेंट, पब्लिसिटी, प्रायव्हसी आणि कॉपीराइट संबंधी कायदेशीर सल्ला देतात. मात्र, जेव्हा पत्नी कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार झाल्या तेव्हा त्यांनी या कामापासून सुट्टी घेतली. त्यांनी निवडणूक कॅम्पेनमध्ये मदत केली.
5 / 12
न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये जन्मलेले एमहॉफ आणि कमला हॅरिस यांची भेट २०१३ मध्ये एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती. हॅरिस यांची एक मैत्रिण एमहॉफ यांची क्लाएंट होती. तिनेच दोघांची भेट करून दिली. तेव्हा हॅरिस आणि एमहॉफ यांच्यात ब्लाइंड डेटचा सिलसिला सुरू झाला.
6 / 12
कमला हॅरिस यांनी सीबीएस न्यूज संडे मॉर्निंगला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'माझ्या सर्वात चांगल्या एका मैत्रिणीने आम्हा दोघांना ब्लाइंड डेटवर पाठवलं होतं.
7 / 12
ती म्हणाली होती की, माझ्यावर विश्वास ठेव. तिला वाटत होतं की, मी हे करावं. तिने हेही सांगितलं होतं की, त्याला गूगल करू नकोस, पण मी केलं. हे समजल्यावर एमहॉफ शॉक्ड झाले होते'.
8 / 12
डगलस एमहॉफ यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. त्याआधी त्यांनी १९९२ मध्ये कर्स्टिन एमहॉफसोबत लग्न केलं होतं.
9 / 12
डगलस आणि कर्स्टिन यांना दोन मुलंही आहेत. दोन्ही मुलं कमला हॅरिससोबत जोडले गेले आहेत. ही मुलं म्हणतात की, 'ती जगातली सर्वात चांगली सावत्र आई आहे'.
10 / 12
कमला हॅरिस यांनी गेल्यावर्षी आपला २०१९ चा रिटर्न जाहीर केला होता. हॅरिस आणि त्यांचे पती डगलस यांनी त्यांची संपत्ती ३.१ मिलियन डॉलर म्हणजे २२.६१ कोटी रूपये दाखवली आहे. त्याआधी २०१८ मध्ये त्यांनी १.८९ लाख डॉलर म्हणजे १.३१ कोटी रूपये उत्पन्न दाखवलं होतं.
11 / 12
कमला हॅरिस आणि त्यांचे पती डगलस यांची एकूण संपत्ती २०१९ मध्ये जवळपास २.८ मिलियन डॉलर(२०.४२ कोटी रूपये)पासून ६.३ मिलियन डॉलर म्हणजे ४५.९५ कोटी रूपये इतकी झाली आहे.
12 / 12
कमला हॅरिस आणि त्यांचे पती डगलस यांची एकूण संपत्ती २०१९ मध्ये जवळपास २.८ मिलियन डॉलर(२०.४२ कोटी रूपये)पासून ६.३ मिलियन डॉलर म्हणजे ४५.९५ कोटी रूपये इतकी झाली आहे.
टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJoe Bidenज्यो बायडन