Kenya's rare white female giraffe 'killed by poachers'
धक्कादायक! जगातील दुर्मीळ जातीच्या पांढऱ्या जिराफांची शिकार By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 3:19 PM1 / 10तुम्ही आतापर्यंत भुऱ्या रंगाचे जिराफ पाहिले असेल. मात्र पांढऱ्या रंगाचे जिराफ क्वचितच पाहिले असणार. अशा दुर्मीळ पांढऱ्या रंगाच्या दोन जिराफांची शिकाऱ्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. 2 / 10या घटनेमुळे जगात आता फक्त एकच पांढऱ्या रंगाचे जिराफ असल्याचे सांगण्यात येत आहे.3 / 10उत्तर-पूर्व केनियाच्या ग्रासिया काउंटी येथे शिकाऱ्यांनी अतिशय दुर्मीळ अशा पांढऱ्या जिराफ मादी आणि तिच्या पिल्लाची शिकार केली आहे. 4 / 10वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या दोन्ही जिराफांचे मृतदेह आढळले. 5 / 10या प्रजातीचे जगात केवळ तीनच जिराफ होते व आता यातील फक्त एकच शिल्लक आहे.6 / 10जानकारांच्या मते, हा पांढरा रंग ल्यूसीज्म नानाच्या एका दुर्मिळ परिस्थितीमुळे होते. 7 / 10यामुळे त्यांच्या पेशींमध्ये रंग (पिगमेन्टेशन) येत नाही. या पांढऱ्या जिराफांचे फोटो 2017 मध्ये व्हायरल झाले होते.8 / 10आफ्रिका वाइल्ड लाइफ फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांत जिराफांच्या संख्येत 40 टक्के घट झाली आहे.9 / 10मांस आणि चामड्यासाठी जिराफांची हत्या करण्यात येत असल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे. 10 / 101985 साली जिराफांची संख्या 1 लाख 55 हजार होती. तर, 2015 च्या आकडेवाडीनुसार, ही संख्या आता 97 हजार राहिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications