Killer virus from chicken farms could wipe out half of mankind, scientist warns api
कोरोनाहून 'डेंजर' असेल पुढचा विषाणू, अर्ध्या लोकसंख्येच्या जिवाला धोका; वैज्ञानिकाचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 2:36 PM1 / 7कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू असतानाच अमेरिकेतील एका प्रसिद्ध वैज्ञानिकांनी हैराण करणारा इशारा दिला आहे. मायकल ग्रेगर यांनी जगाला इशारा देताना सांगितले आहे की, चिकन फार्म्समधून असे व्हायरसक पसरू शकतात, ज्यांनी कोरोना व्हायरसपेक्षाही मोठी महामारी निर्माण होऊ शकते.2 / 7मनुष्यांना केवळ व्हेज खाण्याचा सल्ला देणारे मायकल ग्रेगर यांनी त्यांच्या नव्या 'How To Survive A Pandemic' या पुस्तकात सांगितले आहे की, मोठ्या प्रमाणात चिकन फार्मिंगने होणारा धोका वाढला आहे. ग्रेगर म्हणाले की, चिकन फार्म्समधून निघणारा व्हायरस हा इतका घातक असू शकतो की, याने अर्ध्या जगाला धोका होऊ शकतो.3 / 7मायकल ग्रेगर यांच्या या 'भविष्यवाणी'बाबत कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत आणि दुसऱ्या कोणत्याही वैज्ञानिकांनी याला दुजोराही दिला नाही. पण मायकल ग्रेगर यांचं मत आहे की, मनुष्यांची इतर जीवांशी जवळीकच त्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. (संदर्भ : https://www.dailymail.co.uk/news/article-8370969/The-apocalyptic-killer-virus-coming-home-roost.html)4 / 7आतापर्यंतच्या माहितीच्या आधारावर असं मानलं जातं की, कोरोना व्हायरस हा वटवाघूळ किंवा इतर एका जीवामुळे पसरला आहे. यासाठी चीनच्या वुहानमधील मांसाचं एक मार्केट जबाबदार मानलं जातं'.5 / 7डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकन वैज्ञानिक मायकल ग्रेगर यांचा दावा आहे की, चिकम फार्ममधून निघणारे व्हायरसने होणारा धोका कोरोना व्हायरसपेक्षा खूप मोठा असेल आणि याने मोठ्या जगातील अर्धे लोक मारले जातील.6 / 7मायकल ग्रेगर यांच्या मताला जगातील इतर कोणत्याही वैज्ञानिकाने दुजोरा दिलेला नाही. पण कोरोना पसरल्यानंतर अनेक देशातील जाणकारांनी जगभरात वेगवेगळ्या जंगली जीवांचे मार्केट बंद करण्याची मागणी केली आहे.7 / 7अनेक देशांनी चीनकडेही ही मागणी केली आहे की, त्यांनी जंगली जीवांचं मार्केट बंद करावं. मायकल ग्रेगर यांचा हा महामारीबाबतचा दावा कितपत खरा ठरेल माहीत नाही. पण जगभरातील लोकांना कोरोनामुळे एक मोठा धडा मिळाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications