शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kim Jong Un: जग पाहत राहिले! किमने रात्रीच मोठी परेड भरवली; हजारोंच्या उपस्थिती, महाविनाशक शस्त्रास्त्रे दाखविली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 4:10 PM

1 / 10
एकीकडे जग महायुद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी परतत असताना उत्तर कोरियाने जगाच्या चिंता वाढविल्या आहेत. हुकूमशहा किम जोंग उन याने नुकतीच एक मोठी परेड भरविली होती. यामध्ये सर्वात खतरनाक मिसाईल दाखवून अमेरिकेला मोठा संदेश दिला आहे.
2 / 10
अमेरिका आणि दक्षिण कोरिया एक युद्धाभ्यास करत आहेत. यामुळे किम जोंग उनने देखील आपली ताकद दाखविण्यासाठी मोठी परेड भरविली होती. या परेडमध्ये Hwasong-17 ही मिसाईल दिसली. ही मिसाईल १५ हजार किमीपर्यंत मारा करू शकते.
3 / 10
किम जोंग उन याने म्हटले की, देशाची अणुखस्ती वाढविण्यासाठी वेगाने काम केले जाणार आहे. अण्वस्त्रांची फक्त संख्याच वाढविली जाणार नाही, तर त्यांची गुणवत्ताही सुधारली जाणार आहे. अण्वस्त्रे ही राष्ट्रीय शक्तीचे प्रतिक आहेत.
4 / 10
यामुळे कोरियाई द्विपांवर वातावरण बिघडले आहे. किमने सांगितले की, भविष्यात येणाऱ्या कोणत्याही राजकीय आणि सैन्य संकटावर मात करण्यासाठी आम्हाला आमची ताकद वाढवावी लागेल. उत्तर कोरियाची ही परेड रात्री १० वाजता सुरु झाली होती. किमसोबत त्याची पत्नी री सोल देखील उपस्थित होती.
5 / 10
उत्तर कोरियाने आपल्या सैन्याच्या ९० व्या स्थापना दिवसानिमित्त सोमवारी रात्री सैन्याची परेड आयोजित केली होती. आम्हाला कोणावर हल्ला करायचा नाहीय, परंतू अण्वस्त्रांचा मुख्य उद्देश युद्ध रोखणे हा आहे. मात्र, आमच्या जमिनीवर जर कोणती विचित्र परिस्थिती उत्पन्न झाली, तर आम्ही आमची अण्वस्त्रे फक्त युद्ध रोखण्यापर्यंतच सीमित ठेवणार नाही, असा इशारा किम यांनी दिला आहे.
6 / 10
कोणत्याही देशाने, मग तो कोणीही असो आमच्या हितांचे उल्लंघन केले किंवा प्रयत्न जरी केला तरी आमचे अण्वस्त्र दल दुसऱ्या मिशनवर काम करू लागेल, असे किम म्हणाले. या परेडमध्ये अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दाखविण्यात आली.
7 / 10
उत्‍तर कोरियाने या परेडमध्ये टँक, चिलखती वाहने, तोफखाने आणि रॉकेट लाँचर दाखविले आहेत. किमने मागील काही महिन्यांत अनेक मिसाईलच्या चाचण्या घेतल्या आहेत. तज्ज्ञांनुसार देशावर असलेले निर्बंध आणि अन्य सवलती मिळवण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी उत्तर कोरिया हे करत आहे.
8 / 10
उत्तर कोरियाने यावर्षी 13 शस्त्रास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत, ज्यात आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणीचा समावेश आहे. 2017 नंतर प्रथमच आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी यंदा घेण्यात आली.
9 / 10
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथील किम इल सुंग स्क्वेअर येथे आयोजित या भव्य परेडसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.
10 / 10
रस्ते चारही बाजूंनी सजले होते. हवेत रंगीबेरंगी नजाराही दिसत होता. नेत्रदीपक आतषबाजीने परेडची सांगता झाली.
टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाAmericaअमेरिका