know about florona infection symptoms causes and how dangerous its with corona
Florona: कोरोनानंतर जगासमोर आता फ्लोरोना आजाराचे नवे संकट; ‘ही’ आहेत लक्षणे; पाहा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 11:33 AM1 / 12गेली जवळपास दोन वर्षे जग कोरोना संकटाशी दोन हात करत आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी कोरोना लस हाच एकमेव आणि सर्वोत्तम उपाय असल्याने जगभरात कोरोना लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.2 / 12कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डेल्टा व्हेरिएंटने जगभरात कहर केला. डेल्टा व्हेरिएंटपासून काहीसा निश्वास टाकत असतानाच ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेत या नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. 3 / 12ओमायक्रॉनमुळे नवीन मोठी लाट येण्याची शक्यता असताना आता नव्या व्हायरसने हजेरी लावली आहे. इस्त्रायलमध्ये नवा व्हायरस सापडल्याने कोरोनानंतर आता हा व्हायरस धडकी भरवतो का काय अशी शास्त्रज्ञांना शंका निर्माण झाली आहे. (Florona Infection)4 / 12इस्त्रायलमध्ये कोरोना लसीचे बुस्टर डोसही मोठ्या प्रमाणावर देण्यात आले आहेत. इस्त्रायलमध्ये नव्या व्हायरसचा जगातील पहिला रुग्ण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हायरसचे नाव फ्लोरोना ठेवण्यात आले असून कोरोना आणि इन्फ्लूएन्झाच्या दुहेरी संक्रमणाचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे.5 / 12गेल्या आठवड्यात रॅबिन मेडिकल सेंटरमध्ये मुलाला जन्म देणाऱ्या गर्भवती मातेला या फ्लोरोनाची लागण झाली आहे. इस्रायलचे आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा अभ्यास सुरु असल्याचे म्हटले आहे. इस्रायल हा जगातील पहिला आणि सध्या एकमेव देश आहे जिथे कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन बूस्टर डोस दिले जात आहेत.6 / 12दोन विषाणूंच्या मिश्रणामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोग्य अधिकार्यांचा असा अंदाज आहे की 'फ्लोरोना' इतर रूग्णांमध्ये देखील असू शकतो, जो चाचण्यांअभावी समोर आला नाही.7 / 12आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिना काही नवीन आजार किंवा नवीन प्रकार नाही. फ्लोरोना हा कोरोना आणि इन्फ्लूएन्झाच्या डबल इन्फेक्शन असल्याचे म्हटले जाते आहे. यामध्ये रुग्णाला कोरोना विषाणूसह इन्फ्लूएन्झा व्हायरसचा संसर्ग होतो. ज्यामुळे हा संसर्ग कोरोनापेक्षा दुप्पट धोकादायक बनू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. (florona infection symptoms)8 / 12इन्फ्लूएन्झा विषाणूच्या संसर्गामुळे न्यूमोनिया, मायोकार्डिटिस यांसारखी अनेक गंभीर लक्षणे उद्भवू शकतात. यामध्ये काहीवेळा रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. तसेच या संसर्गामुळे न्यूमोनियासह इतर श्वसनाचे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या मृत्यूचा धोका वाढतो, असे सांगितले जात आहे. (florona infection causes)9 / 12इस्रायलमध्ये कोरोना लसीचे चार डोस दिले जात आहेत. अलीकडेच, इस्रायलने लसीचा चौथा डोस देण्याची चाचणी सुरू केली. हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास असल्याचे मानले जाते. राजधानी तेल अवीवच्या बाहेरील शिबा मेडिकल सेंटरमध्ये, बूस्टर डोस मिळालेल्या १५० वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर चाचण्या सुरू झाल्या, त्यांना फायझर/बायोनटेक लसीचा चौथा डोस देण्यात आला.10 / 12कर्मचार्यांना दिलेल्या अतिरिक्त डोसची चाचणी केली गेली आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडी पातळी कमी झाल्याचे आढळून आले. ही चाचणी अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा इस्रायली अधिकारी देशाच्या लोकसंख्येला दुसरा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहेत.11 / 12कारण ओमिक्रॉनचे संक्रमण देशाबाहेर वाढत आहे. चौथा डोस खरोखरच ओमिक्रॉनपासून संरक्षण प्रदान करतो आणि त्याची खूप गरज आहे, हे सिद्ध करू शकू, असे शिबा मेडिकल सेंटरमधील कार्डिओव्हस्कुलर ट्रान्सप्लांटेशन विभागाचे माजी संचालक प्रोफेसर जेकब लावे म्हणाले.12 / 12दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील नाइट कर्फ्यूचे नियमही हटवले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications