शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा पगार माहित्येय? जाणून घ्या, सुविधा आणि भत्ते

By देवेश फडके | Published: January 20, 2021 11:50 AM

1 / 8
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथबद्ध होत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे पद हे अतिशय ताकदवान असते. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे फेडरल कायद्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या मर्यादा आणि सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. राष्ट्राध्यक्षांचा महिन्याचा पगार, अन्य सुविधा आणि भत्ते कायद्यानुसार दिले जातात. जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष आहेत.
2 / 8
न्यूयॉर्कमधील वेबसाइट स्टाइल कास्टरनुसार अमेरिकन कायद्याप्रमाणे राष्ट्राध्यक्षांचे वार्षिक वेतन चार लाख अमेरिकन डॉलर आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षाला सुमारे दोन कोटी ९२ लाख रुपये पगार दिला जातो. याशिवाय ५० हजार रुपये वार्षिक भत्ता देण्यात येतो. तसेच एक लाख डॉलर आयकरमुक्त प्रवासी भत्ता दिला जातो.
3 / 8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मनोरंजनासाठीही काही पैसे दिले जातात. याची रक्कम १९ हजार डॉलर इतकी आहे. ही रक्कम स्वतःसाठी आणि कुटुंबीयांच्या मनोरंजनासाठी वापरता येते. फर्स्ट लेडी म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला पगार, भत्ता दिला जात नाही.
4 / 8
सन १७८९ मध्ये प्रथम राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पाचवेळा राष्ट्राध्यक्षांच्या पगारात वाढ करण्यात आली. सन २००१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पगार दोन लाखांवरून चार लाख अमेरिकन डॉलर करण्यात आला होता.
5 / 8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पगार दिला जात असला, तरी यापूर्वी काही राष्ट्राध्यक्षांनी वेतन घेण्यास नकार दिला आहे. १९१७ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेल्या हर्बर्ट यांनी वेतन घेतले नव्हते. त्यांचे निर्धारित वेतन दान करण्यात आले.
6 / 8
सन १९६१ मध्ये राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या जॉन कॅनेडी यांनीही वेतन घेण्यास नकार दिला होता. वार्षिक भत्त्यापोटी त्यांनी केवळ ५० हजार अमेरिकन डॉलर घेतले. कॅनेडी यांनी राष्ट्राध्यक्षपदाचे वेतन विविध धार्मिक संस्थांना दान केले.
7 / 8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडलेल्या व्यक्तीला पगाराव्यतिरिक्त अन्य भत्ते मिळतात. याशिवाय लिमोसीन, मरीन वन आणि एअर फोर्स वनमध्ये मोफत प्रवासाची मुभा असते. तसेच व्हाइट हाऊसमध्ये मोफत वास्तव्याची सुविधा प्रदान करण्यात येते.
8 / 8
राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या व्यक्तीचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात येतो. दोन लाख अमेरिकन डॉलर निवृत्ती वेतन या व्यक्तीला देण्यात येते. तसेच आरोग्य सेवा, शासकीय यात्रा आणि एक कार्यालय अशाही सुविधा देण्यात येतात.
टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्ष