ladakh fearful of indian army preparations china deploys flying hospital in tibet
भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल' By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 1:25 PM1 / 10लडाखमधील भारतीय लष्कराची जोरदार तयारी आणि गलवान खो-यातल्या प्रतिसादाने चीन पुरता घाबरलेला असून, त्यानं आता तिबेटमध्ये प्रथमच 'फ्लाइंग हॉस्पिटल' तयार केले आहे. 2 / 10या 'फ्लाइंग हॉस्पिटल'च्या मदतीने चीन आपल्या जखमी सैनिकांना हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यास सक्षम असेल. 3 / 10चीनला अशी भीती वाटत आहे की, जर भारताशी संघर्ष झाला तर त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासू शकेल. चीनचं हे 'फ्लाइंग हॉस्पिटल' का विशेष आहे हे जाणून घेऊयात....4 / 10वस्तुतः भारताच्या सीमेवरील या भागात चिनी सैन्याच्या आरोग्याच्या सुविधा फारच निकृष्ट दर्जाच्या असून, त्यांना Y-9 वैद्यकीय विमान तैनात करावे लागले आहे. दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी सैन्याचा सराव करताना एक अधिकारी गंभीर जखमी झाला. 5 / 10जखमी अधिका-याला चांगल्या उपचारासाठी 5200 किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यासाठी Y-9 वैद्यकीय विमानात पाठविण्यात आले. या विमानातून त्या अधिका-याला शिजिंग येथील रुग्णालयात नेण्यात आले.6 / 10गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात 20 भारतीय जवानांना वीरगती मिळाली. चीनने आपल्या ठार सैनिकांचा खुलासा केला नाही.7 / 10चिनी सैनिकी सूत्रांनी दावा केला आहे की, लडाखमधील संघर्षात चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात मारले गेले आहेत. जवळपास 40 चिनी सैनिक ठार झाल्याची माहिती भारतीय व अमेरिकन सूत्रांनी दिली आहे. 8 / 10चिनी सूत्रांच्या माहितीनुसार, गलवानसारख्या संघर्षानंतरही आरोग्य सुविधा सुधारण्याची गरज आहे, जेणेकरून मृत्यूची संख्या कमीत कमी राखली जाऊ शकेल, असं चिनी सैन्याचं मत आहे. 9 / 10वाय -9 हे एक उड्डाण करणारे रुग्णालय आहे आणि गंभीर जखमी सैनिकांचे प्राण वाचविण्यात मदत होईल. या व्यतिरिक्त हिमालयीन प्रदेशातील सीमेवरील अनेक रुग्णालये प्रथमोपचार मदतीसाठी हायपर ऑक्सिजन चेंबरसह सुसज्ज आहेत. 10 / 10चीन या प्रदेशातील सर्व रुग्णालयांचे आधुनिकीकरण करीत आहे. विमान कॉर्डिओग्राम मॉनिटर, श्वसन यंत्र आणि इतर उपकरणांनी सुसज्ज आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications