शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Libya Floods: वाळवंटात वादळ, नदी गायब; लीबियाच्या डर्नामध्ये ५३०० जणांचा मृत्यू, १० हजार लोक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 1:05 PM

1 / 12
लीबियाच्या डर्ना शहरात गेल्या २४ तासांत १५०० हून अधिक लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. तर ५३०० लोकांचा मृत्यू झाला असून दहा हजारांहून अधिक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळामुळे पूर आला. त्यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. डॅनियल असं या वादळाचं नाव आहे. (फोटो - रॉयटर्स)
2 / 12
अनेक शहरांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. डर्नामध्ये पाच हजारांहून अधिक लोक मारले गेल्याचं म्हटलं आहे. लीबियाचे मंत्री मोहम्मद अबु लमौशाने दिलेल्या माहितीनुसार, २३०० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मोठं नुकसान झालं आहे. (फोटो - एपी)
3 / 12
डॅनियल वादळामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घरं कोसळून पडली आहेत. पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिज तुटले आहेत. यासारखी भयंकर परिस्थिती लोकांनी आधी कधीच पाहिली नव्हती. (फोटो - एपी)
4 / 12
डॅनियल वादळाला मेडिकेन असं देखील म्हटलं जात आहे. लीबिया इन्फ्रास्टॅक्चरकडे कोणीच लक्ष देत नाही. पण आता हळूहळू डर्नामध्ये बाहेरची मदत पोहोचू लागली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. (फोटो - रॉयटर्स)
5 / 12
डर्ना हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं एक शहर आहे. जिथे जवळपास ८९ हजार लोक राहतात. मात्र आता पुरामुळे सर्व उद्ध्वस्त झालं आगे. रस्तावर पाणीच पाणी आहे आणि ब्रिज तुटले आहेत. अनेक ठिकाणी वाईट परिस्थिती आहे. (फोटो - एपी)
6 / 12
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस एंड रेड क्रिसेंट सोसायटीचे लीबिया दूत तामेर रमादान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांचा आणि बेपत्ता असलेल्यांचा आकडा आणखी वाढू शकतो. जवळपास दहा हजार लोक बेपत्ता झाल्याचं सध्या सांगण्यात आलं आहे. (फोटो - एपी)
7 / 12
तामेर रमादान यांनी सांगितलं की, लीबियाची परिस्थिती ही मोरक्कोपेक्षा गंभीर आहे. मोरक्कोत भूकंप आला असून तीन हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. डर्ना आणि लीबियात रविवारी रात्री वादळ आलं आहे. सर्व शहरांत पाणीच पाणी झालं आहे. (फोटो - रॉयटर्स)
8 / 12
डर्नामध्ये सर्वच गोष्टी उद्ध्वस्त झाल्या आहे. ना इमारती राहिल्या, ना रस्ते राहिले, ना धार्मिक स्थळं राहिली. सर्वत्र कचरा आणि चिखल पाहायला मिळत आहे. शहरातील एक नदीच गायब झाली आहे. (फोटो - रॉयटर्स)
9 / 12
नदीच्या पाण्याची आधी पातळी वाढली मग इमारती कोसळल्या. पुरामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक गाड्या देखील पुरात वाहून गेल्या, झाडं उन्मळून पडली आहेत. लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
10 / 12
लीबियाच्या हवामान खात्याने सांगितलं की त्यांनी लोकांना डॅनियल वादळाची माहिती जवळपास ७२ तास आधीच दिली होती. लोकांना सुरक्षित स्थळी जायला सांगितलं होतं पण लोकांनी ते अजिबात ऐकलं नाही. यामुळे कठीण परिस्थिती ओढावली आहे. (फोटो - रॉयटर्स)
11 / 12
पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी आता रबर बोटची मदत घेतली जात आहे. पण काही ठिकाणी पाणी नसून चिखल आहे. अनेक मृतदेह हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. (फोटो - एपी)
12 / 12
विमानाने 14 टन मेडिकल सप्लाय आणि हेल्थ वर्कर्स हे बेंगाजीहून डर्नाकडे पाठवण्यात आले आहेत. मिस्त्र, तुर्की आणि इतर ठिकाणाहून मदत मिळत आहे. जर्मनी, फ्रान्स आणि इटलीने देखील मदत करण्याची घोषणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (फोटो - रॉयटर्स)
टॅग्स :floodपूरcycloneचक्रीवादळ