Lockdown again in this country, three weeks 'off' in israel. benjamin netnyahoo
'या' देशात पुन्हा लॉकडाऊन, तीन आठवड्यांचा 'बंद' By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 11:27 AM1 / 10इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीनामा द्यावा, या मागणीसाठी त्यांच्या घरासमोर हजारो लोकांनी शनिवारी निदर्शने केली. 2 / 10कोरोना महामारीच्या उद्रेकाची स्थिती योग्यपणे हाताळली नसल्याचाही त्यांच्यावर आरोप करीत लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इस्रायलमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत आहे. 3 / 10यहुदी नववर्षापूर्वीच पुन्हा एकदा इस्रायलमध्ये देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. पोलिसांनी शनिवारी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. नेतन्याहू यांनी निदर्शकांना अराजकतावादी म्हटले आहे.4 / 10इस्रायलमध्ये शुक्रवारपासून दुसरा लॉकडाऊन करण्यात येत असून हा लॉकडाऊन तीन आठवड्यांचा असणार आहे. सध्या, इस्रायलमध्ये कोरोनाचे १,५०,००० रुग्ण आढळले असून, १,१०० पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.5 / 10 इस्रायलमध्ये दररोज 4 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे हे लॉकडाऊन करण्यात येत आहे. या लॉकडाऊनची मोठी किंमत देशाला चुकवावी लागणार असल्याचेही नेतन्याहू यांनी म्हटलंय. 6 / 10 यहुदी नववर्षापूर्वीच देशात लॉकडाऊन करण्यात येत असल्याने तेथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनाही हा निर्णय मान्य नसल्याचे समजते.7 / 10 कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाण्याच्या विरोधात प्रमुख मंत्री याकोव लित्जमॅन यांनी राजीनामा दिला. महामारीच्या प्रारंभी आरोग्यमंत्री राहिलेले व सध्या आवासमंत्री असलेले याकोव यांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.8 / 10इस्रायलमधील लॉकडाऊनमध्ये 10 पेक्षा जास्त लोक घरात नसावेत, आणि 20 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 9 / 10शाळा व शॉपिंग सेंटर बंद करण्यात येत आहेत, नागरिकांना आपल्या घराजवळील 500 मीटर अंतरापर्यंतच बाहेर निघण्यास मुभा देण्यात आली आहे. 10 / 10 गैरसरकारी कार्यालय व उद्योग खुले राहतील, पण ग्राहकांना व नागरिकांना तेथे जाण्यास परवानगी नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. देशातील सुपर मार्केट व औषधांची दुकाने अत्यावश्यक सेवा असल्याने सुरुच राहणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications