Long distance haircut amid the coronavirus outbreak in China
Coronavirus : कोरोनाची अशीही दहशत; चीनच्या सलून्समध्ये लाँग डिस्टन्स हेअर कट By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 2:47 PM1 / 12चीनमधून जगात पसरलेल्या कोरोना विषाणूनं आतापर्यंत तीन हजारांहून अधिक जणांचा जीव घेतला आहे. चीनमधल्या तब्बल ८० हजारहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 2 / 12कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. चीनमधले बहुतांश जण मास्क लावूनच फिरत आहेत. 3 / 12कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. मात्र अद्याप तरी या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.4 / 12चीनमधल्या दैनंदिन जीवनावर कोरोनाचा प्रचंड परिणाम झाला आहे. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी हरतऱ्हेचे उपाय केले जात आहेत. 5 / 12चीनमधल्या हेअर कटिंग सलूनमध्येही कोरोनाची दहशत पाहायला मिळते आहे. 6 / 12सलूनमधल्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. ते तीन ते चार फुटांवरुन ग्राहकांचे केस कापत आहेत. 7 / 12जवळून केस कापताना सलूनमधील कर्मचाऱ्यांना केसांचा व्यवस्थित अंदाज येतो. लांबून केस कापताना मात्र हेअर स्टाईल बिघडण्याची जास्त भीती असते. 8 / 12चीनमधल्या सलूनमध्ये ३ ते ४ फुटांवरुन केस कापले जात आहेत. या लाँग डिस्टन्स हेअर कटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 9 / 12हेनान प्रांतातल्या कित्येक सलूनमध्ये लाँग डिस्टन्स हेअर कट केला जात आहे. सलूनमधले कर्मचारी तीन ते चार फुटांच्या काठीला कात्री, ट्रिमर, ब्रश, कंगवा लावून केस कापत आहेत. 10 / 12हेनान भागातली परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. मात्र सलूनमधले कर्मचारी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीत. 11 / 12काठीला कात्री, ट्रिमर, ब्रश, कंगवा लावून केस कापताना सलूनमधल्या कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत करावी लागते आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कर्मचारी ही मेहनत घेत आहेत. 12 / 12सार्वजनिक स्थळांवर एकमेकांपासून ५ फूट दूर राहण्याच्या सूचना चीन सरकारनं दिल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications