- मयूर पठाडेहा शेजारचा फोटो पाहा. किती वर्षांची आहे ही बिकिनीतील तरुणी? वीस? पंचवीस? तीस?.. त्याच्यापेक्षा तर नक्कीच तिचं वय जास्त नाहीए ना?पण सपशेल आपटी खाल्लीत तुम्ही! तुमचा अंदाज पार गडगडला.ही तरुणी आहे चार नातवांची आजी आणि तिचं वय आहे ७० वर्षे!दचकलात ना?या आजीबार्इंची आणखी माहिती हवी?आणि त्या एवढ्या तरुण कशा झाल्यात हेही तुम्हाला जाणून घ्यायचंय ना?या आजीबार्इंचं नाव आहे कॅरोलिन हार्टझ आणि त्या आहेत आॅस्ट्रेलियातील पर्थ येथील.त्यांना गोड खाण्याची खूप आवड होती आणि त्यासाठी त्यांचा हातही फारसा आखडत नव्हता, पण तीस वर्षांपूर्वी त्यांना ‘प्रि-डायबेटिस’ डायग्नॉस झाला, म्हणजे त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नॉर्मलपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं. हा डायबेटिस नव्हता, पण ती धोक्याची एक घंटा होती. ही घंटा त्याचवेळी त्यांच्या डोक्यात वाजली आणि त्यांनी ठरवलं, आता साखर सोडायची.. आणि त्याचक्षणी त्यांनी साखर, गोड खाणं सोडलं ते आजतागायत. आज वयाच्या सत्तरीतही या आजीबाई स्विमसूट आणि बिकिनी घालू शकतात आणि त्यांचं वय किमान तीस वर्षांनी कमी दिसू शकतं याचं मूख्य रहस्य यातच आहे.अर्थातच कॅरोलिन आजीबाई यासोबत नियमितपणे व्यायामही करतात आणि खेळही खेळतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या वयावर मात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी आजीबार्इंनी आपले हे हॉट फोटो सोशल मिडियावर टाकले आणि जगभरात लगेचंच ते व्हायरल झाले. हे फोटो लाखो लोकांनी लाईक केले आणि एकमेकांना फॉरवर्डही केले. जगभरात या आजीबार्इंच्या चाहत्यांची संख्या काही क्षणांत झप्पकन वाढली आणि या आजीबार्इंचं तारुण्य पाहून चकितही झाले. या आजीबार्इंनी नेमकं काय केलं, म्हणून त्यांचं वय इतकं कमी झालं, याबाबतचा शोध घेण्यात नेटकऱ्यांत आता चढाओढ लागली आहे.आजीबार्इंनी या नेटकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे, ‘साखरेपासून दूर राहा आणि न चुकता व्यायाम करा. तुम्हीही माझ्यासारख्याच तरुण दिसाल आणि व्हालही..’