शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्वा! अखेर 'तो' खजिना सापडला, 10 लाख डॉलर्सचं रहस्य 10 वर्षांनंतर उलगडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 9:03 PM

1 / 10
जगभरात कलाकृती आणि मौल्यवान वस्तूंचा शोध घेणाऱ्या ट्रेझर हंटरचा कोट्यवधी रुपयांचा खजिना तब्बल एका दशकानंतर सापडला आहे. हा खजिना खडकाळ पर्वतांमध्ये (रॉकी माउंटेंस) सापडला आहे. तो ट्रेझर हंटर फॉरेस्ट फेन यांनी लपवला होता. फेन यांनी सांगितले, की आता तो खजिना पूर्वेकडून आलेल्या एका व्यक्तीने शोधून दाखवला. त्याने मला त्याचे फोटोही पाठवले आहेत.
2 / 10
89 वर्षीय फॉरेस्ट फेन यांनी दहा वर्षांपूर्वी एका तांब्याच्या पेटाऱ्यात सोने, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवून ती पेटी खडकाळ पर्वतात लपवली होती. (फोटो- एपी)
3 / 10
89 वर्षीय फॉरेस्ट फेन यांनी दहा वर्षांपूर्वी एका तांब्याच्या पेटाऱ्यात सोने, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवून ती पेटी खडकाळ पर्वतात लपवली होती. (फोटो- एपी)
4 / 10
फॉरेस्ट फेन म्हणाले, मला ज्यांनी या खजिन्याचे फोटो पाठवले आहेत, त्यांची नाव सार्वजनिक करण्याची इच्छा नाही. या पेटाऱ्यात 1 मिलियन यूएस डॉलर म्हणजे जवळपास 7.54 कोटी रुपयांचा खजिना आहे.
5 / 10
हा खजिना शोधण्यासाठी फॉरेस्ट फेन यांनी एक 24 ओळींची कविता लिहिली होती. यात खजिना कसा शोधायचा याचे संकेत दिलेले होते. ही कविता त्यांच्या ऑटोबायोग्राफी 'द थ्रिल ऑफ द चेस'मध्येही होती. ही कविता त्यांनी नुकतीच ऑनलाइनदेखील टाकली होती.
6 / 10
अमेरिकेतील खडकाळ पर्वतांमध्ये हजारो लोकांनी हा खजिना शोधण्याच प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. मात्र हा खजिना ज्या व्यक्तीने शोधला त्याला पूर्ण कविता पाठ होती. त्याला प्रत्येक शब्द आणि संकेत कळत होते.
7 / 10
फॉरेस्ट फेन यांनी सांगितले, की हा खजिना शोधण्याच्या नादात चार जणांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. मात्र त्यांना तो शोधता आला नाही. या तांब्याच्या पेटाऱ्यात सोन्याची पावडर, नाणी, सोन्याची हतोडी, प्रीहिस्टोरिक मिरर, प्री-कोलंबियन अॅनिमल फिगर्स आदी वस्तू होत्या.
8 / 10
या पेटाऱ्यात मौल्यवन दगड, रत्न, हिरा, पन्ना, माणिक आदी वस्तूदेखील आहेत. फॉरेस्ट फेन म्हणाले, त्या पेटाऱ्याचे वजन 9 किलो आहे आणि त्यातील खजिना 10 किलो एवढा आहे. म्हणजे एकूण खजिन्याचे वजन तब्बल 19 किलो एवढे झाले.
9 / 10
या खजिन्यासंदर्भात फॉरेस्ट म्हणतात, खजिना शोधणाऱ्याप्रती मला आनंदही होत आहे आणि खजिना जाण्याचे दुःखही होत आहे. मात्र, हा जीवनाचा भाग आहे. ज्यांनी-ज्यांनी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.
10 / 10
ज्या व्यक्तीने हा खजिना शोधून काढला, ती कविता प्रेमी तर आहेच, शिवाय संकेत समजण्यातही मास्टर आहे. त्यामुळे ती व्यक्ती खजिना शोधू शकली. मी या यशाबद्दल त्या व्यक्तीचे अभिनंदन करतो, असेही फॉरेस्ट फेन म्हणाले.
टॅग्स :GoldसोनंAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिका