Man gifts girlfriend a dna test on christmas exposing a family secret which hidden for 30 years
प्रियकराने दिलेल्या एका गिफ्टमुळे उलगडलं प्रेयसीच्या आईचं 30 वर्षांपूर्वीचं गुपीत, तरुणीला बसला जबरदस्त धक्का! By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 29, 2020 2:13 PM1 / 9आजकाल कुणालाही गिफ्ट देणे फारशी मोठी गोष्ट नाही. कुठल्याही उत्सवानिमित्त लोक आपल्या जवळच्या व्यक्तीला गिफ्ट्स देताना दिसतात. मात्र, एका व्यक्तीला आपल्या प्रेयसीला गिफ्ट देणे एवढे महागात पडले आहे, की ती व्यक्ती पुढच्या वेळी एखाद्याला गिफ्ट देताना हजार वेळा विचार करेल.2 / 9अमेरिकेत ख्रिसमसनिमित्त एका युवकाने आपल्या प्रेयसीला एक खास गिफ्ट दिले. मात्र, या गिफ्टमुळे प्रेयसीच्या कुटुंबातील तब्बल 30 वर्षांपूर्वीचे गुपीत उलगडेल, असा त्याने कधी विचारही केला नसेल. 3 / 9एका युवकाने रेडिट (Reddit) रिलेशनशिप अॅडव्हाइज फोरमवर आपला किस्सा सांगितला आहे. या वेयक्तीने सांगितले, की 'ख्रिसमसनिमित्त त्याने आपल्या पार्टनरसाठी डीएनए टेस्टिंग किट खरेदी केली होती. मात्र, या किटमुळे त्याच्या गर्लफ्रेंडचे संपूर्ण आयुष्यच बदलले.4 / 9प्रियकराने सांगितले, की या डीएनए किटने त्याच्या प्रेयसीने टेस्ट केली. यानंतर आलेल्या निकालावरून, आपल्या कुटुंबात अणखी एक मुलगी म्हणजेच आपली सावत्र बहिण असल्याचेही त्याच्या प्रेयसीला समजले. 5 / 9ही गोष्ट समजताच तिने थेट आपल्या आईला फोन लावला आणि यासंदर्भात विचारणा केली. मात्र, तिच्या आईने तिला कुठलीही सावत्र बहिण असल्यासंदर्भात नकार दिला.6 / 9यानंतर या तरुणीने तिच्या आईला थेट जॉन स्मिथ नावाच्या व्यक्तीसंदर्भात विचारले, तेव्हा तिची आई अवाक झाली. कारण, तरुणीच्या सावत्र बहिणीच्या वडिलांचे नाव जॉन स्मिथ असल्याचे या डीएनए टेस्टमधून समोर आले होते.7 / 9यानंतर तरुणीच्या आईने अशी कहाणी सांगितली, जी आजवर कुणालाही माहित नव्हती.8 / 9तरुणीच्या आईने सांगितले, की काही दिवसांपूर्वी ती तिचा एक्स बॉयफ्रेंड जॉन स्मिथला भेटण्यासाठी गेली होती. यानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले, की आपण गर्भवती आहोत आणि आपल्या पोटातील बाळ हे बॉयफ्रेंड जॉन स्मिथचे आहे.9 / 9या सावत्र मुलीसंदर्भात आपण आजवर कुणालाही काहीही सांगितलेले नाही, असा खुलासाही तिच्या आईने यावेळी केला. आपल्या आईने केलेला हा धक्कादायक खुलासा ऐकूण मात्र, तरुणीला जबरदस्त धक्का बसला. आणखी वाचा Subscribe to Notifications