शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

350 फुटांवरुन पाणी पडणारा ' मानवनिर्मित धबधबा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 3:24 PM

1 / 6
चीनमधील एका कंस्ट्रक्शन कंपनीने जगातील सर्वात उंच मानवनिर्मित धबधबा तयार केला आहे. या धबधब्याची उंची तंब्बल 350 फूट उंच आहे. विशेष म्हणजे या धबधब्याला चक्क एका इमारतीवरुन तयार करण्यात आले आहे.
2 / 6
इमारतीवरुन खाली पडणाऱ्या या धबधब्यातील पाणी 4 मोठ्या पंपांच्या सहाय्याने पुन्हा इमारतीच्या छतावर नेण्यात येते. जे पाणी खाली पडते, तेच पाणी पुन्हा वापरात येते.
3 / 6
या धबधब्याला विशेष दिनीच चालविण्यात येते. कारण या धबधब्याला चालविण्यासाठी एका तासाला 7 हजार रुपयांची वीज खर्ची होते. त्यामुळे याचा वापर खास कारणास्तवच केला जातो.
4 / 6
काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनमध्ये हा धबधबा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, अनेकांनी या धबधब्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच हा वायफळ खर्च असून केवळ दिखावा असल्याचीही चर्चा होते.
5 / 6
अनेकांनी या धबधब्याचे कौतूक केले असून या धबधब्यामुळे शहराची शान वाढली आहे. तसेच शहराचे नाव जागतिक पातळीवर घेतले जाईल, असेही अनेकांना वाटते.
6 / 6
अनेकांनी या धबधब्याचे कौतूक केले असून या धबधब्यामुळे शहराची शान वाढली आहे. तसेच शहराचे नाव जागतिक पातळीवर घेतले जाईल, असेही अनेकांना वाटते.
टॅग्स :Dudhsagar waterfallदुधसागर धबधबा