manage the income of American billionaires and earn billions of rupees
'या' देशातील श्रीमंतांची संपत्ती सांभाळा अन् वर्षाला 3 कोटी रुपये पगार मिळवा! By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 7:43 PM1 / 8जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश म्हणजे अमेरिका. येथे मोठ्या प्रमाणावर श्रीमंत लोक राहतात. हे लोक आपल्या संपत्तीची व्यवस्था पाहण्यासाठी लोकांना शोधत असतात. यासोबतच ते फॅमिली ऑफीसही चलातात. यासाठी ते मोठा पगार देऊन प्रोफेशनल्सदेखील हायर करतात. 2 / 8अमेरिकेत एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, 'तुम्हाला भविष्यात मोठे व्हायचं असेल तर एखाद्या श्रीमंत व्यक्तीचे फॅमिली ऑफिस सांभाळा. पैसे तर मिळतीलच, पण अनेक श्रीमंतांची ओळखही होईल.'3 / 8रिक्रूटमेंट फर्म एग्रेयूस ग्रुपच्या मते, वर्षाला 3.96 लाख डॉलर्स म्हणजे जवळपास, 3 कोटी रुपये यापेक्षा अधिक पगारावर नोकरी करणारे सर्वाधिक प्रोफेशनल्स अमेरिकन फॅमिली ऑफिसमध्येच काम करतात. 4 / 8हा रिपोर्ट 671 फॅमिली ऑफिसमध्ये काम करमाऱ्या प्रोफेशनल्सशी चर्चाकरून तयार करण्यात आला आहे. जगात सध्या 10 हजारहून अधिक सिंगल फॅमिली ऑफिस आहेत. 5 / 8अकाउंटिंग फर्म ईवाईच्या मते, यांपैकी जवळपास अर्धे गेल्या दोन दशकांत सुरू झाले आहेत. यात अल्फाबेटचे एरिक श्मिट आणि मीडिया मुगल जेम्स मर्डोक यांच्या फॅमिली ऑफिसचादेखील समावेश आहे. 6 / 8अशा श्रीमंत लोकांच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला, तुमच्या भविष्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. केवळ प्रामाणिकपणे त्यांचा पैसा आणि संपत्ती तसेच गुंतवणूक सांभाळा आणि स्वत:देखील मोठे व्हा.7 / 8फॅमिली ऑफिसेससाठी अमेरिका हा सर्वात चांगला देश आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे फॅमिली ऑफिस हायरिंगमध्ये 80 टक्क्यांनी घट झाली आहे. कारण जगातील अनेक उद्योग धंद्यांबरोबरच कोरोनाचा फटका फॅमिली ऑफिसेसलाही बसला आहे. 8 / 8फॅमिली ऑफिस हायरिंगमध्ये या सहामाईत गेल्या वर्षीच्या याच अवधीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी घट झाली आहे. अहवालानुसार, जुलै महिन्यापासून यात सुधारणा होण्याची आशा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications