संकट संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' नव्या आजाराची भीती, लाखो लोकांचा होऊ शकतो मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 15:45 IST
1 / 7कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 / 7जग अजूनही कोरोना आणि मंकीपॉक्स सारख्या धोकादायक आजारांशी लढत आहे. कोरोनाचा सामना करत असताना आता पुन्हा एकदा ध़डकी भरवणारी माहिती समोर आली आहे. आणखी एका धोकादायक आजाराने डोकं वर काढलं असून भविष्यात तो आजार मोठ्या महामारीचे रूप धारण करू शकते, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. 3 / 7कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कोरोनाने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. या आजाराने महामारीचे रूप धारण केले तर तो इबोलापेक्षाही धोकादायक ठरू शकतो, असे संशोधकांचे मत आहे. डब्ल्यूएचओने डिजीज X विरुद्ध आता काम करण्यास सुरुवात केली आहे.4 / 7संशोधकाने या आजाराबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या आजाराने ग्रस्त असलेल्या 80 टक्के लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हे इतके धोकादायक आहे की आजपर्यंत शास्त्रज्ञांना याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही. 5 / 7कोरोनानंतर बहुतांश लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे. दरम्यान, काही संशोधकांचा असा विश्वास आहे की हा रोग सहजपणे अधिक लोकांना आपल्या जाळ्यात ओढू शकतो. नव्या आजारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण आहे. 6 / 7मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम आफ्रिकेतील देशात याचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये रुग्णाची नीट काळजी न घेतल्यास त्याचा प्रसार देशाच्या मोठ्या भागात होऊ शकतो. डिजीज X वरील उपचारासाठी संशोधक रात्रंदिवस संशोधन करत आहेत. या आजाराचा सामना करण्यासाठी WHO ने सुमारे 300 शास्त्रज्ञांची टीम तयार केली आहे. 7 / 7ही टीम या आजारावर परिणाम दर्शविणारी औषधे आणि लसींच्या संशोधनावरही काम करेल. संशोधकांचा असा दावा आहे की जर या आजाराने महामारीचे रूप धारण केले तर तो कोरोना आणि इतर कोणत्याही संसर्गजन्य साथीपेक्षा जास्त लोकांचा बळी घेऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.