शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संकटं संपता संपेना! कोरोना, इबोलापेक्षा अधिक जीवघेणा आहे 'हा' व्हायरस; WHO ने केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:00 AM

1 / 11
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत.
2 / 11
जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना व्हायरसचं विविध रुप समोर येत आहे. नवनवीन व्हायरस समोर येत असून त्यामुळे चिंतेत अधिक भर पडत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
3 / 11
कोरोनाने थैमान घातलेले असताना आता आणखी एका व्हायरसने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना आणि इबोलाहून अधिक जीवघेणा हा व्हायरस असल्याचं म्हटलं जात आहे.
4 / 11
मारबर्ग असं या व्हायरसचं नाव असून तो कोरोनापेक्षाही खतरनाक असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हायरसबाबात जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) अलर्ट दिला आहे. मारबर्ग व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 / 11
पश्चिमी आफ्रिकन देश घानामध्ये मारबर्गचे दोन संशयित प्रकरणं समोर आली आहे. या व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने टेन्शन वाढलं आहे. WHO सुद्धा याबाबत सतर्क झाली आहे.
6 / 11
मारबर्ग या व्हायरसची याआधीही काही प्रकरणं समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 1967 मध्येही या व्हायरसची सर्वाधिक प्रकरणं आढळली होती. तेव्हापासून दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत या व्हायरसचा बऱ्याचदा उद्रेक झाला आहे.
7 / 11
मारबर्ग इबोला व्हायरसपेक्षाही किती तरी वेगाने पसरून लोकांना आपल्या विळख्यात घेतो. यामुळे होणारा मृत्यूदर हा 24 ते 88 टक्के आहे. यावरूनच याचा संसर्गाचा वेग किती आहे, याचा अंदाज लावता येतो.
8 / 11
आयसीएमआरचे माजी महासंचालक एन.के. गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस एका व्यक्तीमार्फत दुसऱ्यापर्यंत पसरू शकतो. स्पर्शाने या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. इबोला व्हायरशी संबंधित हा व्हायरस आहे.
9 / 11
मारबर्गची लक्षणं ही फ्लूसारखी असतात. लागण झाली की नाही हे समजण्यासाठी सँपल घेऊन त्याचं सीक्वेंसिंग केलं जातं. असे व्हायरस येत असतात पण आता कोरोनामुळे लोक अशा आजाराबाबत अधिक सतर्क झाले आहेत.
10 / 11
डॉ. एम. वली यांनी सांगितलं की, मारबर्ग व्हायरसची प्रकरणं याआधी आढळली असली तरी कोरोनाच्या कालावधीत हा व्हायरस अॅक्टिव्ह होणं हे ठीक नाही कारण हा व्हायरस इबोलासारखाच पसरतो.
11 / 11
मारबर्गवर कोणतंही अँटीव्हायरल औषध किंवा लस नाही. सुदैवाने आफ्रिकाबाहेरील देशात याची प्रकरणं नाहीत पण तरी लोकांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं डॉ. एम वली यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना