Marburg virus a highly infectious disease detected in West Africa for first time
कोरोना पाठोपाठ नवं संकट! घातक मारबर्ग विषाणूचा पहिला रुग्ण सापडला; जगभरात खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 1:49 PM1 / 8गेल्या पावणे दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. या संकटातून अद्याप जग सावरलेलं नाही. कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. 2 / 8कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरणाला वेग दिला जात आहे. त्यातच कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट चिंतेत भर घालत आहेत. त्यामुळे पुढील लाटेचा धोका कायम आहे.3 / 8कोरोनाचं संकट कायम असताना पश्चिम आफ्रिकेतल्या गिनी देशात मारबर्ग विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. मारबर्ग विषाणू इबोला आणि कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे. 4 / 8मारबर्ग विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे गिनीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मारबर्ग विषाणू वटवाघूळांच्या माध्यमातून पसरतो.5 / 8२ ऑगस्टला दक्षिण गुएकेडो प्रांतात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरात मारबर्ग विषाणू सापडला. शवविच्छेदनातून ही माहिती समोर आली.6 / 8मारबर्ग विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी त्याला ट्रॅक करण्याची गरज असल्याचं आफ्रिकेतील जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय संचालक मात्शिदिसो मोएती यांनी सांगितलं.7 / 8गिनीमधील इबोला विषाणूचा खात्मा झाल्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर आता गिनीमध्ये मारबर्ग विषाणू सापडला आहे.8 / 8गेल्याच वर्षी गिनीमध्ये इबोला संकट निर्माण झालं. त्यात १२ जणांचा बळी गेला. यानंतर आता देशावर मारबर्ग विषाणूमुळे नवं संकट ओढावलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications