marijuana can control CoronaVirus increase in human body; big research in Canada hrb
CoronaVirus 'बदनाम' भांग उतरवणार कोरोनाची झिंग; वाढ रोखण्यावर 'या' देशात संशोधन By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 1:26 PM1 / 10कोरोनाचे जगभरात ५० लाखांवर रुग्ण झाले असून जवळपास ३.२८ लाख बळी गेले आहेत. तरीही अद्याप लस तयार झालेली नाही. यातच चीनमध्ये कोरोनाचे रौद्ररुप समोर आले आहे. अशातच भारतात नशेसाठी वापरली जाणारी भांग जगासाठी तारणहार ठरणार आहे. 2 / 10कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील रथी महारथी दिवस रात्र एक करत आहेत. कोणी तंबाखू, तर कोणी गंगेचे पाणी कोरोनावर प्रभावी ठरेल असे सांगत आहे. तर कॅनडाच्या संशोधकांनी थेट भांगेवर मोठे संशोधन केले आहे. 3 / 10कॅनडाच्या संशोधकांनी भांग म्हणजेच मरिजुआनामध्ये असलेल्या एका घटकाद्वारे कोरोनाचा शरीरातील प्रसार बऱ्यापैकी रोखता येईल, यावर संशोधन केले आहे. 4 / 10अल्बर्टामधील लेथब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी भांगेच्या १२ प्रजातींवर रिसर्च सुरु केला आहे. यातील काही घटक कोरोना व्हायरसची शरीरातील वाढती संख्या रोखू शकणार असल्याचे समोर आले आहे. 5 / 10भांगेपासून मिळणाऱ्या कॅनबिडिओलच्या अर्कामध्ये असलेले नॉन सायकोअॅक्टिव्ह घटक मानवी शरीरातील कोरोना व्हायरसला शोषणाऱ्या कोशिकांना ७० टक्के कमी करू शकतो. 6 / 10मात्र, वैज्ञानिकांनी सांगितले की, कोरोनापासून वाचण्यासाठी भांगेचे सेवन करू नये. आम्हाला सध्या हे संशोधन क्लिनिकल ट्रायलद्वारे आणखी विकसित करावे लागणार आहे. या घटकाचा वापर डॉक्टरांनी थ्रीडी आर्टिफिशिअल ह्यूमन मॉडेलवर केला आहे. 7 / 10याद्वारे असे समोर आले आहे की, मानवी शरीरातील कोरोना व्हायरसला ग्रहण करणाऱ्या कोशिकांवर भांगेच्या अर्काने प्रभाव टाकला आहे. या कारणामुळे कोरोनाचा शरीरातील वाढ रोखली जाऊ शकते. 8 / 10या संशोधनात सहभागी पॉथवे आरएक्सचे सीईओ डॉ. इगोर कोवलचुक यांनी सांगितले की, मरिजुआनामुळे मिळणाऱ्या कैनबिडिओल अर्कातून मिळणाऱ्या एका घटकाने कोरोनाच्या रिसेप्टर्सची संख्या ७३ टक्क्यांनी कमी केली. 9 / 10भांगेचे सध्या बाजारात असलेली उत्पादने ही कोरोनासाठी बनविण्यात आलेली नाहीत. कदाचित त्यांच्यामध्ये जो कोरोनाला रोखणारा घटक आहे तो नसू शकतो. यामुळे आम्ही क्लिनिकल ट्रायल घेतल्यानंतरच यावर स्पष्ट सांगू शकतो. 10 / 10जर हा प्रयोग यशस्वी झाला तर कैनबिडिओलच्या अर्काचा वापर तोंड धुणे, गुळण्या करणे, जेलच्या रुपात केला जाऊ शकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications