शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेलानिया डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याची चर्चा, किती रक्कम मिळणार हे वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 4:22 PM

1 / 10
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या अडचणीत कमीच होताना दिसत नाहीयेत. ६ जानेवारीला कॅपिटल बिल्डींगवर ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला केल्यावर त्यांच्यावर महाभियोग तर चालवला जात आहे.
2 / 10
सोबतच त्यांच्या पर्सनल लाइफमध्येही अडचणी सुरू आहेत. रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, मेलानिया ट्रम्प लवकरच घटस्फोट घेऊ शकतात.
3 / 10
ब्रॅन्ड आणि मॅनेजमेंट एक्सपर्ट एरिक शिफर यांनी सांगितले की, मला पूर्ण आशा आहे की, मेलानियाचे सल्लागार त्यांना लवकरच डोनाल्ड ट्रम्पपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला देत असतील.
4 / 10
ट्रम्प यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांना १५० मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ११ अब्ज रूपये मेलानियांना मिळू शकतात. अशात जसजशा ट्रम्प यांच्या विरोधात केसेस सुरू होती. ते कायदेशीर गोष्टींमध्ये अडकत जातील. मेलानिया यांच्यासाठी अडचणी वाढू शकतात.
5 / 10
ट्रम्प आणि मेलानिया यांच्या नात्याबाबत काही दिवसांपासून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प आणि मेलेनिया दोघे गेल्या ४ वर्षात जास्तीत जास्त वेळ वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपत होते.
6 / 10
त्यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांची माजी राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅनने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की ट्रम्प आणि मेलानिया यांचं दीड दशकांपासून सुरू असलेला संसार आता संपला आहे. पण मेलानिया यांनी त्यावेळी याचं खंडन केलं होतं.
7 / 10
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे १८६९ नंतर पहिले असे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत जे त्यांच्यानंतर होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. तसेच ते पहिले असे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्यावर दोनदा महाभियोग चालवला गेला.
8 / 10
तेच मेलानिया यांनी व्हाईट हाउसची परंपरा तोडत जाण्याआधी व्हाईट हाउसमधील स्टाफकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. त्यांनी इथे काम करणाऱ्या ८० लोकांना कोणतीही धन्यवाद नोट लिहिली नव्हती.
9 / 10
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांची लव्हस्टोरी १९९८ मध्ये सुरू झाली होती. न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीकच्या आयोजनानंतर टाइम्स स्क्वेअवर किटकॅट क्लबमध्ये एक पार्टी झाली होती. याच पार्टीत मेलानिया आणि ट्रम्प यांची भेट झाली होती.
10 / 10
त्यावेळी डोनाल्ड हे ५२ तर मेलानिया २८ वर्षांची होती. त्यानंतर सहा वर्षांनी डोनाल्ड यांनी दीड मिलियनची डायमंड रिंग देऊन मेलानिया यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. २००५ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.
टॅग्स :Melania Trumpमेलेनिया ट्रम्पDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पDivorceघटस्फोटmarriageलग्न