Married Hina Rabbani had an affair with a young leader Bilawal Bhutto
विवाहित हिना रब्बानींचं ११ वर्षे लहान तरुण नेत्यासोबत होतं अफेअर, राष्ट्रपती भवनात सापडले होते रंगेहात, त्यानंतर... By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 2:25 PM1 / 9पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यापासून हिना रब्बानी खार पाकिस्तान आणि भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्या आहेत. पाकिस्तानच्या ग्लॅमरस नेत्या म्हणून भारतीय मीडियामध्येही त्या खूप चर्चेत असतात.2 / 9हिना रब्बानी खार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री असताना त्यांच्या आणि बिलावल भुत्तोंमध्ये रंगलेल्या अफेअरचीही नव्याने चर्चा रंगली आहे. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळातही या अफेअरची खूप चर्चा रंगली होती. आता त्या पुन्हा मंत्री बनल्यानंतर त्यांचं नाव पुन्हा एकदा बिलावल भुत्तो यांच्यासोबत जोडले जात आहे. 3 / 9हिना रब्बानी खार आणि बिलावल भुत्तो यांच्यातील अफेअरची चर्चा २०१२ मध्ये सुरू झाली होती. तेव्हा बिलावल भुत्तो हे २४ वर्षांचे तर हिना रब्बानी खार ३५ वर्षांच्या होत्या. या अफेअरचं वृत्त सर्वप्रमथम एका बांगलादेशी टॅब्लॉइडमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली होती. 4 / 9आता नव्या मंत्रिमंडळात हिना रब्बानी यांना राज्यमंत्री बनवण्यात आलं आहे. त्याआधी २०११ ते २०१३ दरम्यान, त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या राजकीय परिपक्वतेबरोबरच त्यांच्य राजकीय कौशल्याचीही नेहमीच चर्चा होत आली आहे. 5 / 9दरम्यान, बांगलदेशी वृत्तपत्राने २०१२ मध्ये दावा केला होता की, बिलावल भुत्तो हे हिना रब्बानी खारच्या प्रेमात पडले आहेत. हिना रब्बानी त्यांच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठ्या आहेत आणि विवाहित आहेत. 6 / 9हिना रब्बानी खार यांचा विवाह पाकिस्तानमधील मोठे उद्योगपती फिरोज गुलजार यांच्याशी झाला होता. त्यांच्यापासून हिना रब्बानी यांना दोन मुलीही आहेत. दरम्यान, बिलावल भुत्तोंसोबत विवाहासाठी हिना रब्बानी खार पतीला घटस्फोट देऊन आपल्या मुलींना सोडण्यासही तयार झाल्याची चर्चा होती, असा दावाही बांगलादेशी वृत्तपत्राने गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला होता. 7 / 9दरम्यान, या अफेअरबाबत अजून खळबळजनक खुलासा करताना बांगलादेशी वृत्तपत्राने हिना रब्बानी खार आणि बिलावल भुत्तो यांना पाकिस्तानचे तात्कालीन राष्ट्रपती आणि बिलावल भुत्तोंचे वडील आसिफ अली झरदारी यांनी राष्ट्रपती भवनात रंगेहात पडकल्याचाही दावा केला होता. या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. मात्र नंतर अत्यंत काळजीपूर्वक हे प्रकरण दाबण्यात आले होते. 8 / 9तर भारत, पाकिस्तान आणि बांगालदेशमधील सोशल मीडियावर हिना रब्बानी खार आणि बिलावल भुत्तो यांच्यातील अफेरअरची खूप चर्चा झाली होती. वाद वाढल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्याचीही मागणी झाली होती. तर या दोघांनाही समर्थन देणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय होती. हिना रब्बानी यांनी बिलावल भुत्तोंसोबत विवाह करावा असा सल्लाही अनेकांनी दिला होता. 9 / 9दरम्यान, या अफेअरमुळे काही मौलवींनी हिना रब्बानी खार यांच्याविरोधात फतवाही जाहीर केला होता. अखेरीस राजकीय कुटुंबांच्या वाढत्या दबावानंतर हिना रब्बानी खार आणि बिलावल भुत्तो हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications