Married man caught red-handed with girlfriend, stuffed in cage and thrown into river
विवाहित पुरुषाला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले, पिंजऱ्यात भरून नदीत फेकले By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 1:02 PM1 / 5विवाहित असतानाही गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले गेल्यानंतर या तरुणाला लोकांनी पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 2 / 5फसवणूक करताना पकडण्यात आल्यानंतर तरुणाला नदीत फेकण्यात आल्याचा हा प्रकार चीनमध्ये घडला आहे. अॅडल्टीच्या प्रकारांमध्ये चीनमध्ये प्राचीन काळापासून लोकांना अशा प्रकारे शिक्षा देण्यात येत असे. पिंजऱ्यात भरून फेकण्यात आल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू होत असे. 3 / 5डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सदर तरुण बेडवर असतानाच लोकांनी त्याला पकडले. त्यानंतर बांबूपासून बनलेल्या पिंजऱ्यात भरून त्याला दोरीने बांधून घातले. 4 / 5बातमीतील उल्लेखानुसार हा प्रकार शुक्रवारी सकाळी उत्तर चीनमधील माओमिंग शहरात घडला. मात्र या तरुणाला नदीत फेकण्यात आल्यानंतर काही वेळातच बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. 5 / 5 नदीमध्ये फेकण्यात आल्यानंतरही या तरुणाला सुदैवाने गंभीर जखमी झालेला नाही. मात्र तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेमागील कारणांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications