शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठी बातमी! मंगळाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर; जनजीवनाची आशा, पाहा...

By मोरेश्वर येरम | Updated: February 12, 2021 14:13 IST

1 / 10
मंगळ ग्रहावर बाष्पाचा थर आढळून आला आहे. रशिया आणि युरोपच्या स्पेस एजंसीच्या वैज्ञानिकांनी हा आश्चर्यचकीत करणारा शोध लावला आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, मंगळ ग्रहाच्या वातावरणात बाष्पाचा पातळ थर आढळून आला आहे. युरोप आणि रशियाच्या संयुक्त विद्यमानं कार्यरत असलेल्या सॅटलाइट एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑरबिटरने याचा शोध लावला आहे. या शोधाचं नेमकं महत्व काय आहे हे जाणून घेऊयात... (फोटो सौजन्य- गेटी इमेजेस)
2 / 10
युरोपची अंतराळ संशोधन संस्था (ESA) आणि रशियाची अंतराळ संशोधन संस्थेने (Roscosmos) १४ मार्च २०१६ रोजी एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑरबिटरचं (ExoMars Trace Gas Orbiter) यशस्वी उड्डाण केलं होतं. १९ ऑक्टोबर २०१६ रोजी हे एक्सोमार्स ऑरबिटरने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. तेव्हापासून मंगळावरील सर्व गोष्टींवर संशोधन केलं जात आहे. तिथं अस्तित्वात असलेल्या विविध वायूंचं या उपग्रहामार्फत संशोधन करणं शक्य होत आहे. (फोटो सौजन्य: ESA)
3 / 10
ExoMars च्या मदतीनं मंगळ ग्रहावरील वातावरणात बाष्पाचा पातळ थर आढळून आल्याचं संशोधन समोर आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्यामुळे एकेकाळी मंगळावर जीनजीवन होतं असा कयास बांधला जात आहे.
4 / 10
मंगळावर प्राचीन घाट माथ्यावर आणि नद्यांमध्ये एकेकाळी पाणी वाहत होतं, असा अंदाज या बाष्पाच्या अस्तित्वाच्या शोधानंतर व्यक्त केला जात आहे. मंगळावर मिळालेल्या पाण्याचे अस्तित्व हे आतापर्यंत बर्फ आणि जमीनीखालील पाण्याच्या स्वरुपात मिळालं आहे.
5 / 10
मंगळाच्या वातावरणात बाष्पाचं प्रमाण आढळलं म्हणजेच या ग्रहावर पाणी आहे याला दुजोरी मिळतो. ExoMars च्या मदतीनं मिळालेली सर्व माहिती सायन्स एडव्हान्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
6 / 10
ExoMars च्या मदतीनं मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर शास्त्रज्ञांना लक्षात आलं की, ज्यावेळी सूर्यकिरणं मंगळ ग्रहावरुन जातात तेव्हा या ग्रहावर असलेल्या बाष्पाचा थर स्पष्टपणे दिसून येतो. ExoMars सोबत पाठविण्यात आलेल्या नादिर अँड ऑक्लटेशन फॉर मार्स डिस्कव्हरी नावाच्या यंत्रानं हा शोध लावला आहे.
7 / 10
नादिर अँड ऑक्लटेशन फॉर मार्स डिस्कव्हरी हे यंत्र सध्या मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घेत आहे. या यंत्रानं आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध लावल्याचं ब्रिटन ओपन युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ प्राध्यपक मनिष पटेल यांनी सांगितलं. मंगळावरील पाण्याचा साठा हळूहळू का नष्ट होत गेला याचीही शोध आता घेता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
8 / 10
बाष्प आढळलं याचा अर्थ मंगळावर पाणी देखील आहे. पण ते नेमकं कुठे? किती प्रमाणात आहे? हे आताच सांगणं शक्य नाही. पण मंगळावरील पाण्याचं अस्तित्व म्हणजे या ग्रहावर याआधी जनजीवन अस्तित्वात होतं हे दर्शविणारं नक्कीच आहे, असं मनिष पटेल सांगतात.
9 / 10
मंगळाभोवतीच्या वातावरणात हायड्रोजन आणि ड्यूटीरियम देखील आहे. त्यामुळे इतिहासात या ग्रहावर पाणी होतं याची पुष्टी यातून होते. ड्यूटीरियममध्ये काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो. सूर्याची किरण मंगळावर आल्यानंतर बाष्पाचा हलका थर वर उठतो आणि अंतराळात गायब होतो, असं मनिष यांनी सांगितलं.
10 / 10
मंगळ ग्रहावरील संशोधनासाठी हा आठवडा अतिशय महत्वाचा राहीला आहे. चीनने बुधवारी मंगळाच्या दिशेनं आपला एक उपग्रह यशस्वीरित्या पाठवला आहे. तर त्याच्या एकदिवस आधीच यूएईच्या होप मार्स मिशनच्या उपग्रहानं यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे.
टॅग्स :Marsमंगळ ग्रहscienceविज्ञानNASAनासा