शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डॉक्टर होता होता राहिली, पाकिस्तानात पहिली हिंदू डीएसपी बनली; करून दाखवलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 5:37 PM

1 / 8
पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांची स्थिती सातत्याने खराब होत चालली आहे. या अशा परिस्थितीत पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू महिला डीएसपी बनली आहे. मनिषा रुपेता असं या महिलेचं नाव आहे.
2 / 8
मनिषा या पाकिस्तानात डीएसपी म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या हिंदू महिला आहेत. सिंधमधील जाकूबाबाद या छोट्याशा शहरातल्या त्या रहिवासी आहेत. येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यांचे वडील जाकूबाबाद येथे व्यापारी होते. मनिषा 13 वर्षांची असताना त्यांचे निधन झाले.
3 / 8
मनिषा यांच्या आईने काबाडकष्ट करून आपल्या पाच मुलांना एकट्याने वाढवले. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्या कराचीला आल्या. मनिषा यांनी आपल्या संघर्षाची कहाणी पाकिस्तानी मीडियाला सांगितली.
4 / 8
त्या काळात जाकूबाबादमध्ये मुलींना शिकवण्याचे वातावरण नव्हते. मुलीला शिक्षणात रस असेल तर ती फक्त वैद्यकीय शिक्षण घेण्यास योग्य समजली जात होती. मनिषा यांच्या तीन बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत, तर तिचा एक लहान भाऊ मेडिकल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.
5 / 8
मनिषा यांनी मी डॉक्टर होण्याचाही प्रयत्न केला होता, पण कमी मार्कांमुळे मला एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही. यानंतर मी डॉक्टर ऑफ फिजिकल थेरपीची पदवी घेतली. माझ्या अभ्यासादरम्यान मी कोणालाही न सांगता सिंध लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत राहिले आणि त्यात मला यश आले असं म्हटलं आहे.
6 / 8
पाकिस्तानमध्ये पोलीस स्टेशन आणि कोर्टात महिला सहसा जात नाहीत. ही जागा महिलांसाठी योग्य मानली जात नाही. त्यामुळे गरज पडेल तेव्हा येथे येणाऱ्या महिला पुरुषांसोबत येतात असं देखील मनिषा यांनी म्हटलं आहे.
7 / 8
चांगल्या कुटुंबातील मुली पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत हा समज मला बदलायचा होता. महिलांसाठी कोणता व्यवसाय आहे आणि कोणता होता याची आम्हाला स्पष्ट कल्पना आहे. पण पोलिसी पेशाने मला नेहमीच आकर्षित केले आणि प्रेरणा दिल्याचं मनिषा यांनी सांगितलं.
8 / 8
डीएसपीचा पदभार स्वीकारण्यापूर्वी मनिषा यांनी कराचीतील सर्वात कठीण प्रदेश, ल्यारी येथे प्रशिक्षण घेतले. या परिसरात पोलीस खात्यात अधिकारी होणाऱ्या मनिषा या पहिल्या महिला आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - अमर उजाला आणि सोशल मीडिया)
टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदू