1 / 9जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने संस्थापक बिल गेस्ट यांनी पत्नी मेलिंडापासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली. दोघांनीही २७ वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला. 2 / 9त्यानंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून चर्चा होऊ लागली. अशात आता मेलिंडा गेट्सपासून वेगळे होत असलेल्या बिल गेट्स यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.3 / 9पत्नी मेलिंडा यांनी एक असं पाउल उचललं ज्याने अब्जाधीश असलेल्या बिल गेट्स यांच्या अडचणी वाढू शकतात. मेलिंडा यांनी आपल्या तिन्ही मुलांसाठी जास्त संपत्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बिल गेट्स यांनी प्रत्येक मुलाला दिल्या जाणाऱ्या संपत्तीची घोषणा आधीच सार्वजनिक केली आहे.4 / 9बिल गेट्स यांनी सार्वजनिकपणे घोषणा केली होती की, ते त्यांच्या संपत्तीतून आपल्या तिन्ही मुलांना प्रत्येकी १० मिलियन अमेरिकन डॉलर देतील. तर बाकीची संपत्ती ते दान करतील. 5 / 9मात्र, डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, मेलिंडा यांनी आश्चर्यजनक पाउल उचलत आपल्या कायदे तज्ज्ञांमध्ये टॉप वकिलांची सेवा घेण्याचा निर्णय घेतलाय.6 / 9दरम्यान आधीच बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या लीगल टीम दोघांची १३० अब्ज डॉलरची संयुक्त संपत्ती विभागण्याचं काम करत आहे.7 / 9तज्ज्ञांचं मत आहे की, टॉप वकिलांची टीम नियुक्त करण्याचा मेलिंडा यांचा निर्णय याकडे इशारा करतो की, त्यांच्या आणि बिल यांच्या जेनिफर(२५), रोरी(२१) आणि फोएबे(१८) मुलांना दिल्या जाणाऱ्या संपत्तीत बदल करायचा आहे.8 / 9सेलिब्रिटी डायवोर्सचे अटॉर्नी न्यूमन कोहेन म्हणाले की, 'बिल गेट्स यांनी गर्वाने जगासमोर घोषणा केली आहे की, ते त्यांच्या तिन्ही लेकरांना आपल्या संपत्तीतून प्रत्येकी १० मिलियन डॉलर देतील.9 / 9तसेच ते म्हणाले होते की, त्यांची शिल्लक राहिलेली अब्जावधीची संपंत्ती ते दान करतील. मात्र, आता हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे. कारण मेलिंडा यांना आपल्या मुलांना १० मिलियन डॉलरपेक्षा जास्त संपत्ती देण्याची इच्छा आहे.