meteorite crashed in Norway, Part Of It May Have Landed Near capital Oslo
नॉर्वेत कोसळले उल्का पिंड, आकाशात मोठ्या आवाजासह दिसला प्रकाश, जीवितहानी नाही By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:04 AM1 / 9 नॉर्वेच्या आकाशात रविवारी एक मोठा उल्का पिंड दिसला. लोकांना हा उल्का पिंड कोसळताना मोठा आवाजही ऐकू आला.2 / 9 जाणकारांचे म्हणणे आहे की, या उल्काचा काही भाग राजधानी ओस्लोमध्ये पडला असावा. पण, अद्याप कोणत्याही नुकसानीची माहीती समोर आलेली नाही.3 / 9 उल्का पिंड दिसल्याच्या बातम्या मध्यरात्री 1 वाजेपासून सुरू झाल्या. ट्रोनधेम शहरातील होलमेस्ट्रँड परिसरात लागलेल्या एका वेब कॅमऱ्यात हा उल्का पिंड पडतानाचे दृष्य कैद झाले.4 / 9 नॉर्वेमधील उल्का पिंडांवर अभ्यास करणारे जाणकार या व्हिडिओ फुटेजचे अॅनालिसिस करुन उल्का पिंडाचे ओरिजन आणि ही उल्का कुठे कोसळली, याचा शोध घेत आहेत.5 / 9 प्राथमिक तपासात ही उल्का नॉर्वेची राजधानी ओस्लोपासून 60 किमी दूर फिनेमार्काच्या जंगलात कोसळल्याची माहिती मिळत आहे.6 / 9 उल्का पिंडावर अभ्यास करणारे मोर्टेन बिलेट यांनी हा उल्का पिंड आकाशातून पृथ्वीर पडताना पाहिलाय. 7 / 9 त्यांनी सांगितल्यानुसार, ही उल्का प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने आली. रविवारी दुपारपर्यंत या उल्काचे अवशेष सापडले नाहीत.8 / 9 बिलेटने पुढे सांगितले की, उल्का पिंड 15-20 किमी प्रती सेकेंदाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होती आणि जवळपास 6 सेकंद याचा लख्ख प्रकास दिसला.9 / 9 काही नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना या उल्काच्या प्रकाशासह एक जोराचा झटका लागला आणखी वाचा Subscribe to Notifications