Mexican drug lord El chapo's wife Emma Coronel Aispuro sentenced to just three years in prison
ड्रग माफियाच्या ब्युटी क्वीन पत्नीचा पश्चाताप पाहून कोर्ट नरमलं, जन्मेठेपेऐवजी दिली केवळ ३ वर्षांची शिक्षा By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 12:00 PM1 / 8कुख्यात ड्रग माफिया अल चापो (El Chapo) ची पत्नी एम्मा कोरोनेल ऐइसपुरो (Emma Coronel Aispuro) वर दया दाखवत कोर्टाने तिला केवळ तिला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ब्युटी क्वीन राहिलेल्या एम्माने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आपल्या पतीच्या गुन्ह्यात बरोबरीने साथ दिली होती. 2 / 8इतकंच नाही तर तिने अल चापोला अमेरिकेतील एका तरूंगातून भुयारी मार्गाने फरार होण्यास मदत केली होती. जे तिने मान्य केलं होतं. 3 / 8एम्मा कोरोनेल ऐइसपुरो (Emma Coronel Aispuro) वर लावलेले आरोप आणि तिच्या जबाबावरून हे मानलं जात होतं की, तिलाही तिच्या पतीप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा मिळेल. पण तसं झालं नाही. सरकारी वकिलांनी तिचा पश्चाताप बघून शिक्षा कमी करावी अशी अपील केली होती. जी कोर्टाने स्वीकारली. 4 / 8एम्माने अल चापो आणि सिनालोआ कार्टेल सोबत मिळून अमेरिकेत कोकेन, मेथाम्फेटामाइन, हेरॉइन आणि गांज्यासारख्या नशेच्या पदार्थांच्या तस्करीचं नेटवर्क सांभाळलं होतं. तिने ड्रग्सच्या धंद्यातील कमाईतून अल चापोला यूएसमधून बाहेर निघण्यास मदत केली होती.5 / 8ड्रग्स माफियाच्या पत्नीला यावर्षी फेब्रुवारीमध्ये व्हर्जिनियाच्या डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती सुरूंगातच आहे. सरकारी वकिलांनी आरोप लावला होता की, एम्मा तिच्या पतीचा ड्रग्सचा धंदा सांभाळत होती. 6 / 8एम्माला धंद्यासंबंधी सगळी माहिती होती आणि तिच्या इशाऱ्यावरच तस्करी होत होती. मेक्सिकोतील सर्वात शक्तीशाली ड्रग लॉर्ड म्हणून अल चापोने अमेरिकेत कोकेन आणि इतर नशेच्या पदार्थांच्या तस्करीसाठी एक कार्टेल चालवलं होतं. 7 / 8अमेरिकेतील माजी ब्युटी क्वीन एम्माने मेक्सिकोमधील खतरनाक ड्रग माफिया अल चापोसोबत २००७ मध्ये १८ वर्षाची झाल्याव लग्न केलं होतं. त्यावेळी अल चापोच्या नावाची चर्चा केवळ अमेरिकाच नाही तर मेक्सिको, ब्राझील, पेरू आणि अर्जेंटिनामध्ये होती.8 / 8२०१२ मध्ये एम्माने कॅलिफोर्नियातील एका हॉस्पिटलमध्ये अल चापोच्या दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता. एम्माने मुलींच्या बर्थ सर्टिफिकेटवर वडिलांचं नाव लपवून ठेवलं होतं. कारण अमेरिकेत त्यावेळी अल चापोवर ३६ कोटी रूपयांपेक्षा जास्त बक्षीस ठेवण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications