जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन करणारे 'क्राउड स्ट्राइक' नेमकं काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 14:32 IST
1 / 7मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरातील कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला. 'क्राउड स्ट्राइक'मुळे मायक्रोसॉफ्टमध्ये ही गडबड झाल्याचे समोर आलं आहे.2 / 7मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील या बिघाडामुळे विमान कंपन्यांपासून रेल्वेपर्यंत जगभरातील अनेक गोष्टींवर लक्षणीय परिणाम झाला आहे. विमानसेवा, बँका, स्टॉक एक्स्चेंज, पेमेंट सिस्टम, दूरसंचार आणि आपत्कालीन सेवा, आरोग्य यंत्रणा आणि ब्रॉडकास्टर सेवा ठप्प पडल्या आहेत.3 / 7यामुळे दिल्ली, ब्रिटन, तुर्की, जर्मनी, स्पेन यांसारख्या अनेक देशांमधून सर्व्हरच्या समस्येमुळे काम ठप्प झाल्याच्या बातम्या येत आहेत.4 / 7CrowdStrike ही सायबर सुरक्षा फर्म आहे. हे एक व्यासपीठ आहे जे क्लाउड-डिलिव्हरी तंत्रज्ञानाच्या इंटीग्रेटेड सेटचे उल्लंघन रोखण्यासाठी काम करते. सोप्या भाषेत जे सर्व प्रकारचे सायबर हल्ले रोखते.5 / 7मायक्रोस्फॉट कंपनीने अपडेट केल्यानंतर ही त्रुटी आली आहे. लोकांच्या स्क्रिनवर येत असलेल्या ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ला ब्लू स्क्रीन एरर देखील म्हणतात.6 / 7भारतात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पैशाचे व्यवहार आणि व्यवसायाशी संबंधित अनेक बाबींमध्ये अडचणी येत आहेत. विमान प्रवासाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.7 / 7एवढंच नाही तर लंडन स्टॉक एक्सचेंज ते अमेरिकेतील ९११ सेवा विस्कळीत झाल्या आहेत. दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टने ही गडबड प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलं आहे.