शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 2:50 PM

1 / 7
यमनच्या बरहूतमध्ये एका विहिरीला 'नरकाचा रस्ता' म्हटलं जातं. असं सांगितलं जातं की, इथे शैतानांना कैद केलं जातं. इतकंच काय तर याच्या आत जिन आणि भूत राहतात. चला जाणून घेऊ याच्या आत वैज्ञानिकांना काय सापडलं.
2 / 7
यमनच्या वाळवंटाच्या मधे एक अशी विहिर आहे जी बऱ्याच वर्षांपासून रहस्य बनून आहे. यमनच्या बरहूतमध्ये स्थित या विहिरीला 'नरकाचा रस्ता' म्हटलं जाऊ लागलं होतं. आता ओमानमधील ८ लोकांच्या टीम या विहिरीत उतरली आणि त्यांनी पाहिलं की, या रहस्यमय खड्ड्यात काय आहे.
3 / 7
असं सांगितलं जातं की, इथे शैतानांना कैद केलं जात होतं. लोकांनी अशीही धारणा आहे की, याच्या आत जिन आणि भूत राहतात. स्थानिक लोक याबाबत बोलण्यासही घाबरतात. अर्थातच वैज्ञानिकांनी या खड्ड्यात सुपरनॅचुरल असं काही सापडलं नाही. वैज्ञानिकांना इथे मोठ्या संख्येत साप आणि गुहेत सापडणारे मोती सापडले.
4 / 7
ओमानजवळचा हा खड्डा ३० मीटर रूंद आणि १००-२५० मीटर खोल आहे. यमनचे अधिकारी बऱ्याच वर्षापासून हा विचार करत आहेत की, या खड्ड्याच्या तळाला काय असेल. ओमान केव्ह एक्सप्लोरेशन टीम या खड्ड्यात उतरली आणि इथे त्यांना मोठ्या संख्येत साप आढळून आले. त्यासोबतच काही मेलेले प्राणी आणि गुहांमध्ये सापडणारे मोती सापडले.
5 / 7
ओमानच्या जर्मन यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे जिऑलॉजीचे प्राध्यापक मोहम्मद अल किंदी म्हणाले की, इथे साप होते. पण त्यांना तुम्ही त्रास दिला नाही तर ते काही करत नाहीत. गुहेच्या भींतीवर काही कलाकृती दिसल्या. ग्रे आणि हिरव्या रंगाचे मोती सापडले. हे वाहत्या पाण्यापासून बनले आहेत.
6 / 7
माहराचे जिओलॉजिकल सर्व्हे आणि मिनरल रिसोर्स अथॉरिटीचे डायरेक्टर-जनरल साला बभैर म्हणाले की, हा फार खोल खड्डा आहे आणि याच्या तळाला फार कमी ऑक्सीजन व व्हेंटीलेशन आहे. सालाह म्हणाले होते की, ५० मीटर खोलपर्यंत जाता आलं. इथे काही विचित्र गोष्टी सापडल्या तर एक वेगळाच वासही येत होता. तसेच आत खोलवर प्रकाशही नाही.
7 / 7
सालाह म्हणाले की, हा खड्डा लाखो वर्ष जुना आहे. आणि यावर जास्त स्टडी, रिसर्च आणि तपास करण्याची गरज आहे. सालाह यांनी याला रहस्यमय स्थिती सांगितलं.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके