Monkeypox is spreading rapidly in france 51 people have been infected world health organization
परिस्थिती गंभीर! फ्रान्समध्ये वेगाने पसरतोय मंकीपॉक्स; 51 जणांना लागण, लोकांना लस घेण्याचं आवाहन By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 9:22 AM1 / 14जग सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. असं असताना आता मंकीपॉक्सने टेन्शन वाढवलं आहे. वेगाने प्रसार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 14फ्रान्समध्ये मंकीपॉक्सने थैमान घातले असून प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हा आजार आता कोरोना व्हायरसप्रमाणे लोकांना घाबरवत आहे. शुक्रवारी माहिती देताना फ्रेंच आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण 51 रुग्ण आढळले आहेत. 3 / 14बुधवारी फ्रान्समध्ये एकूण 33 प्रकरणे नोंदवण्यात आली. फ्रेंच नॅशनल पब्लिक हेल्थ एजन्सीने म्हटलं आहे की मंकीपॉक्सने ग्रस्त सर्व रुग्ण पुरुष आहेत, परंतु ही दिलासादायक बाब आहे की आतापर्यंत फक्त एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे. या रुग्णालाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.4 / 14NDTV नुसार, फ्रान्समधील लोकांना मंकीपॉक्स लस घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ब्रिगिट बौर्गुइग्न म्हणाले की, आरोग्य अधिकार्यांना मंकीपॉक्सच्या रुग्णांची इतकी संख्या बाहेर येईल अशी अपेक्षा नव्हती. 5 / 14देशात लसीची कमतरता नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. फ्रान्स सरकारने मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यास सांगितले आहे.6 / 14शुक्रवारी माहिती देताना, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सांगितले की, आतापर्यंत जगात मंकीपॉक्सची 700 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जर आपण अमेरिकेबद्दल बोललो तर येथे 21 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 7 / 14मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) चिंता वाढली आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी बाधित देशांना सर्व्हिलान्स वाढवण्याचे आवाहन केले आहे. 8 / 14सर्वात मोठा दिलासा म्हणजे मंकीपॉक्स विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण साधारणपणे खूप कमी आहे आणि आतापर्यंत कोणत्याही देशात या आजाराने मृत्यूची नोंद झालेली नाही. पण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 9 / 14मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाला सर्वप्रथम ताप येतो. यानंतर, त्याच्या शरीरावर चेचक पुरळ उठतात. लिम्फ नोडमध्ये सूज देखील असू शकते. विशेष म्हणजे मंकीपॉक्स हा कांजण्या, गोवर, खरुज यांसारख्या आजारांपेक्षा वेगळा आहे. 10 / 14ताप, डोकेदुखी, पाठदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा, लिम्फ नोड्स सुजणे ही सामान्यतः या आजाराची लक्षणे आहेत. मंकीपॉक्सने बाधित रुग्णांमध्ये साधारणपणे ताप 1 ते 3 दिवस टिकतो. मंकीपॉक्सचा इन्क्यूबेशन पीरियड 5 ते 21 दिवसांचा असू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14मंकीपॉक्सचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचं पाहून इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) गंभीर इशारा दिला आहे. हेल्थ एजन्सीचे दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांना हा आजार होण्याचा धोका सर्वात जास्त आहे, त्यामुळे त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे लागेल.12 / 14अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरस वेगाने पसरत आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक माहिती समोर आली आहे, त्यानुसार या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहेत. या आजारात अँटीव्हायरल औषधे आराम देऊ शकतात, असं लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आलं आहे. 13 / 14लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात. हा रिसर्च लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट, ब्रिटन येथे करण्यात आला आहे.14 / 14मंकीपॉक्स व्हायरसमध्ये आत्तापर्यंत कोणतेही अनुवांशिक बदल आढळून आलेले नाहीत, ही दिलासादायक बाब आहे. कॅनडा, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, इटली आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications