More than 200 bodies found at Indigenous school in Canada
सर्वात काळा दिवस! शाळेच्या परिसरात मिळाले २१५ विद्यार्थ्यांचे मृतदेह; जमिनीत दफन केलंय मृत्यूचं रहस्य By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:55 AM1 / 10कॅनडा येथील एका शाळेत जवळपास २१५ मृतदेह दफन केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यातील काही मृतदेह ३ वर्षाच्या मुलांचेही आहेत. या शाळेला कॅनडातील सर्वात मोठी बोर्डिंग स्कूल मानलं जातं. 2 / 10याठिकाणी देशभरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. ज्या शाळेच्या परिसरात मुलांचे मृतदेह आढळले आहेत. त्या शाळेचे नाव कॅमलूप्स इंडियन रेसिडेंशियल स्कूल असं आहे. 3 / 10शाळेचे एक अधिकारी रोजैन केसिमीर यांनी सांगितले की, मागील आठवड्यात ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडारच्या मदतीनं शाळेच्या परिसरात जमिनीखाली मृतदेह दफन असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आणखीही काही मृतदेह सापडण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. 4 / 10ते म्हणाले की, ही एक अशी घटना आहे ज्याचा विचारही कोणी केला नसेल. या घटनेबद्दल बोलू शकतो परंतु या घटनेला इतिहासात नोंद करू शकणार नाही. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला १९७० मध्ये क्रिश्चियन स्कूलमध्ये देशभरातील दीड लाखाहून अधिक विद्यार्थी आणले होते. 5 / 10या विद्यार्थ्यांवर क्रिश्चियन धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता आणि इतकचं नव्हे तर या मुलांना त्यांच्या मातृभाषेत बोलण्याचाही अधिकार नव्हता. अनेकांना मारहाण होत होती. सांगितलं जातं की, त्यावेळी जवळपास ६ हजार मुलांना मारण्यात आलं होतं. 6 / 10या घटनेवरून २००८ मध्ये कॅनडाच्या सरकारने संसदेत माफी मागितली होती. त्यावेळच्या क्रिश्चियन शाळेत मुलांचे शारिरीक आणि लैंगिक शोषण होत असल्याचा आरोपही मान्य करण्यात आला होता. 7 / 10५ वर्षापूर्वी टूथ एँड रिकॉन्सिलिएशन कमिशनचा रिपोर्ट आला होता. या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, गैरवर्तवणूक आणि निष्काळजीपणामुळे कमीत कमी ३२०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर १९१५ ते १९६३ मध्ये कॅमलूप्सच्या शाळेत ५१ मुलांचा जीव घेतल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. 8 / 10कॅमलूप्स स्कूल १८९० ते १९६९ पर्यंत चालवण्यात आलं. त्यानंतर सरकारने कॅथलिक चर्चचं यावरील नियंत्रण काढून ते आपल्या हातात घेतलं. १९७८ मध्ये ही शाळा बद करण्यात आली होती. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात ही शाळा आहे. 9 / 10रोजैन सांगतात की, या शाळेची इमारत पाहिली की तुम्ही अंदाज लावू शकता की यात एकाच वेळी जवळपास ५०० विद्यार्थी राहू शकतात आणि शिक्षण घेऊ शकतात. या घटनेची माहिती मिळताच देशात खळबळ माजली आहे. देशाच्या पंतप्रधानांनीही दु:खं व्यक्त केले आहे. 10 / 10शाळेत मृतदेह मिळण्याच्या बातमीनं आम्ही दुखी आहोत. आमच्या देशातील इतिहासात हा काळा आणि लाजीरवाणा दिवस म्हणून नोंदवला जाईल. या बातमीनं देश हळहळला आहे. आताही शाळेतील जमिनीचा रडार सर्व्हे केला जात आहे. आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ज्या मुलांचा मृतदेह सापडला आहे त्यांच्या कुटुंबीयांचाही शोध सुरू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications