more than 4 lakh new corona cases in 24 hours more than 12 thousand people died
कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत जगभरात 4.13 लाख नवे रुग्ण, 12,000 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:03 PM1 / 15कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 15कोरोनामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली असतानाच आता धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. जगभरातील अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 3 / 15अनेक देशात लसीकरणाची मोहीम सुरू झालेली असतानाच नव्या रुग्णाच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. 4 / 15वर्ल्डोमीटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाचे 4 लाख 13 हजार 694 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून ती संख्या 10 कोटी 87 लाख 2 हजार 714 वर पोहोचली आहे. 5 / 15कोरोनामुळे आतापर्यंत 23 लाख 92 हजार 293 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या 24 तासांत 12 हजार 036 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. 6 / 158 कोटी 08 लाख 62 हजार 501 लोक कोरोनातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 7 / 15महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यां आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा दोन कोटींहून अधिक झाला आहे. 8 / 15अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2620 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 92 हजार 232 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 9 / 15ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15 हज़ार 144 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 758 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 16 हज़ार 287 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 / 15ब्राझील आणि रशियामध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 11 / 15अमेरिकेतील कोरोनाबाधितांची आकडेवारी जगात सर्वाधिक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 15कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून कसा बचाव करायचा हे समोर आलं आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेने आपल्या नागरिकांना दोन मास्क वापरण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. 13 / 15अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनने (सीडीसी) आपल्या रिपोर्टमध्ये याबाबतचे निर्देश दिले आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या (सीडीसी) रिपोर्टनुसार, डिस्पोजेबल सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरल्यास व्हायरसपासून 95 टक्के अधिक सुरक्षिता मिळू शकणार आहे.14 / 15सर्जिकल मास्कच्यावर कपड्यांचा मास्क लावल्यास पहिल्या मास्कच्या बाजूने हवा आत जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मास्क पूर्णपणे फिट असल्याने हवा तोंड, नाकावाटे शरिरात जात नाही आणि त्यामुळे नव्या स्ट्रेनपासून बचाव होऊ शकतो असं नमूद करण्यात आलं आहे.15 / 15सीडीसीचे संचालक रोचेल वालेंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटात यामुळे दिलासा मिळाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications