most developed America still leads in maternal mortality Mass death of women in childbirth
सर्वात प्रगत अमेरिका मातामृत्यूत आजही आघाडीवर; बाळंतपणात महिलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:41 AM1 / 8वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे आज मृत्यूचं प्रमाण जसं खूपच कमी झालं आहे, त्याचप्रमाणे लोकांच्या आयुष्यमानातही बरीच वाढ झाली आहे. 2 / 8लाइफस्टाइलमुळे अनेक नवे आजार निर्माण झाले असले तरी काही जुने, जीवघेणे आजार मात्र जवळपास नामशेष झाले आहेत.3 / 8पूर्वीच्या काळी बाळंतपणात महिलांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू व्हायचे. ते प्रमाणही आता खूपच कमी झालं आहे.4 / 8विकसित देशांत तर हे प्रमाण अत्यल्प आहे. पण ‘सर्वशक्तिमान’ आणि सर्वांत प्रगत देश अमेरिका मात्र याला अपवाद आहे. 5 / 8बाळंतपणातील महिलांचे मृत्यू अमेरिकेत आजही तितकेसे कमी झालेले नाहीत. एक लाख लोकसंख्येमागे अमेरिकेत आजही तब्बल २१पेक्षा अधिक महिला बाळंतपणात मृत्युमुखी पडतात.6 / 8आपल्या देशाला हे शोभणारं नाही, अशी खुद्द अमेरिकन नागरिकांचीच खदखद आहे.7 / 8अमेरिका (२१.१), कॅनडा (११.०), ब्रिटन (९.८), फ्रान्स (७.९), जर्मनी (४.४), जपान (४.३), स्पेन (३.४), नॉर्वे (१.७). 8 / 8संदर्भ : OECD - आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणखी वाचा Subscribe to Notifications