शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली, 191 देशांमध्ये मिळते व्हिसा फ्री एंट्री...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 3:19 PM

1 / 10
सन 2021 मध्ये जारी केलेल्या जागतिक क्रमवारीनुसार, जपानचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.
2 / 10
जपानमध्ये राहणारे लोक या पासपोर्टद्वारे 191 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात. गेल्या चार वर्षांपासून जपान या क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे.
3 / 10
या यादीत सिंगापूर दुसर्‍या क्रमांकावर आहे. या देशात राहणारे लोक 190 देशांमध्ये विना व्हिसा म्हणजेच व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात.
4 / 10
या यादीत जर्मनी आणि दक्षिण कोरिया यांचा तिसरा क्रमांक आहे. दोन्ही देशांमधील लोक 189 देशांमध्ये व्हिसा-फ्री एंट्री करू शकतात. तसेच, या यादीत चौथ्या क्रमांकावर चार देश आहेत.
5 / 10
इटली, फिनलँड, लक्झेंबर्ग आणि स्पेनमध्ये राहणारे लोक 188 देशांमध्ये प्रवास करू शकतात. ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क पाचव्या स्थानावर आहेत आणि या देशांतील लोक 187 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात.
6 / 10
तर सहाव्या स्थानावर फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल आणि स्वीडन हे पाच देश आहेत. या सर्व देशांतील लोक 186 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.
7 / 10
यंदा ही क्रमवारी हॅन्ले पासपोर्ट इंडेक्सद्वारे जारी केली आहे. ही क्रमवारी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट एसोसिएशनच्या डेटावर आधारित आहे. मात्र, या वर्षाच्या क्रमवारीत कोरोना विषाणूच्या साथीमुळे बर्‍याच देशांमधील प्रवासासंबंधी तात्पुरते निर्बंध समाविष्ट झाले नाहीत.
8 / 10
या व्यतिरिक्त बेल्जियम, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, झेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा, कॅनडा, हंगेरी, नॉर्वे, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि यूएसए सारख्या देशांचा समावेश या यादीत दहावा क्रमांक आहे.
9 / 10
सात वर्षापूर्वी अमेरिका या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती.परंतु आता हा देश सातव्या क्रमांकावर घसरला आहे. या यादीमध्ये अफगाणिस्तानचे नाव शेवटचे आहे आणि या देशाचा पासपोर्ट सर्वात कमकुवत आहे.
10 / 10
अफगाणिस्तानात राहणारे लोक फक्त 26 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात. याशिवाय, इराकमधील लोक 28 देशांमध्ये, सिरियाचे 29 देशांमध्ये आणि पाकिस्तानचे लोक केवळ 32 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात.
टॅग्स :passportपासपोर्ट