The most remote places on earth
पृथ्वीवरील अत्यंत दुर्गम ठिकाणे, इथे जाणे आहे मृत्यूला आव्हान देण्यासारखे By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:44 PM1 / 7या पृथ्वीवर अनेक अजब-गजब ठिकाणे आहेत. एकीकडे पृथ्वीवर नयनरम्य निसर्गसौंदर्य आहे. तसेच दुसरीकडे काही अत्यंत दुर्गम अशी ठिकाणेही आहेत. तिथे जाणे हे जणू मृत्यूला आव्हान देण्यासारखेच आहे. अशाच काही ठिकाणांचा घेतलेला हा आढावा. 2 / 7पूर्व अंटार्क्टिक पठार ही पृथ्वीवरील सर्वात थंड जागा आहे. कधी कधी रात्रीच्या वेळी येथील तापमान हे उणे 92 अंशांपर्यंत जाते. 3 / 7अमेरिकेमधील डेथ व्हॅली हे जगातील सर्वात गरम ठिकाण आहे. 10 जुलै 1913 रोजी येथील तापमना 56.7 डिग्री एवढे नोंदवले गेले होते. 4 / 7माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच ठिकाण आहे. माऊंट एव्हरेस्टची उंची 8 हजार 848 मीटर एवढी आहे. हे शिखर सर करणे हे सर्वात कठीण मानले जाते. 5 / 7पॅसिफिक महासागरातील चॅलेंजर डीप ही जगातील सर्वात खोल जागा आहे. याची खोली सुमारे 11 किमी आहे. येथे आतापर्यंत केवळ तीन जणांनाच जाता आले आहे. 6 / 7अटाकामा वाळवंट हे जगातील सर्वात सर्वात शुष्क ठिकाण आहे. या वाळवंटात काही अशी ठिकाणेही आहेत जिथे आतापर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही. 7 / 7भारतातील मौसिनराम हे जगातील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षाकाठी सुमारे 11.86 मीटर पाऊस पडतो. आणखी वाचा Subscribe to Notifications