अश्लीलतेचा कळस गाठत होता मुफ्ती; सोशल मीडिया स्टार हरीम शाहने थोबाडीतच हाणली
By पूनम अपराज | Updated: January 19, 2021 16:24 IST
1 / 8हरिम शाहने सोमवारी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात विवादास्पद मुफ्ती अब्दुल कवीच्या श्रीमुखात लगावली आहे. हरिमने आरोप केला आहे की, मुफ्ती तिच्यासोबत अश्लील बातचीत करत होता. 2 / 8शाहने पोस्ट केलेला व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. एका न्यूज चॅनेलशी बोलताना हरिमने सांगितले की, तिने तिच्या मित्राला कानाखाली वाजवली. कारण तिचा संयमी सुटला होता. 3 / 8टिकटॉकवर सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असलेल्या हरिम शाहने सांगितले की, त्याने माझ्याशी घाणरेडे वक्तव्य केले आणि माझ्याकडे त्याच्या सर्व वक्तव्याची रेकॉर्डिंग देखील आहे. 4 / 8दरम्यान, मुफ्ती अब्दुलने या आरोपांना फेटाळले आहे. मुफ्तीने सांगितले की, जेव्हा हरिमने थोबाडीत मारली, तेव्हा ते पलंगावर होते. त्यांनी पुढे सांगितले की, हरिमसोबत अजून एक महिला होती.5 / 8हरिमने मला थोबाडीत लगावली आणि दुसऱ्या महिलेने ते रेकॉर्ड केले. त्या महिलेला माहिती नव्हते की हरिमने कशासाठी थोबाडीत लागावली असे पुढे मुफ्तीने सांगितले. 6 / 8मुफ्तीला थोबाडीत मारल्याने हरिम शाहचा पाकिस्तानच्या सोशल मीडियावर टॉप ट्रेंटमध्ये समावेश झाला. बऱ्याच लोकांनी हरिमचे समर्थन केले तर काही लोकांनी टिकटॉकर हरिम शाहवर टीका केली. 7 / 8याआधी मुफ्ती अब्दुल कवीचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत हरिमसोबत बोलताना दिसत होते. व्हिडीओ कॉलवर मुफ्ती कवीने सांगितले की, ते हरिम शाहला भेटू इच्छित होते मात्र, काही कारणास्तव ते भेटले नाही, मुफ्तीने हरिमचा चेहरा पाहण्यासाठी देखील बातचीत केली. 8 / 8व्हिडीओमध्ये मुफ्ती हरिम शाहला महाराणी म्हणून बोलावतात. मुफ्ती पुढे बोलत आहेत की, महाराणी राग नको धरू, मला तुझा चेहरा दाखल. याला प्रत्युत्तर म्हणून हरिम बोलते की, ती बोगस लोकांचा चेहरा पाहू इच्छित नाही. काही महिने अगोदर मुफ्तीचा इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मुफ्ती कोरियन महिलेसोबत नृत्य करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओत मुफ्तीसोबत अजून एक व्यक्ती दिसत आहे.