शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Myanmar earthquake : उद्ध्वस्त म्यानमारचे ISRO ने कार्टोसॅट-३ सॅटेलाईटने टिपले फोटो, तुम्ही बघितले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:42 IST

1 / 7
म्यानमारमध्ये प्रलयकारी भूकंपाने अतोनात नुकसान झाले आहे. हा भूकंप इतका तीव्र होता की शेजारी देशांमध्ये त्याचे धक्के जाणवले. प्रचंड जीवित आणि वित्त हानी या भूकंपामुळे झाली असून, अजूनही मदत कार्य सुरूच आहे.
2 / 7
म्यानमारमध्ये भूकंपाने जो विध्वंस घडवला आहे, त्याचे इस्रोने अंतराळातून फोटो टिपले आहेत. सॅटेलाईट फोटोंमध्ये म्यानमारमधील मांडले आणि सगाइंग शहरातील कोसळलेल्या इमारती, रस्ते आणि इतर पडलेल्या वास्तू स्पष्ट दिसत आहेत.
3 / 7
इस्रोने २०१९ मध्ये अवकाशात पाठवण्यात आलेल्या कार्टोसॅट-३ सॅटेलाईटने हे फोटो घेतले आहेत. हे ५० सेंटीमीटरपेक्षाही कमी रेझ्युलेशनने फोटो घेण्यास हे सक्षम आहे. ५०० किलोमीटर अंतरावरून सॅटेलाईटने म्यानमारमधील भूकंपग्रस्त भागाचे फोटो टिपले आहेत.
4 / 7
यात मांडले विद्यापीठ आणि अनंदा पॅगोडाचे झालेले नुकसान चित्रामध्ये दिसत आहे. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने सांगितले की, हे फोटो शनिवारी (२९ मार्च) घेण्यात आले. १८ मार्च रोजी घेण्यात आलेल्या फोटोंशी तुलना करून याचे आकलन करण्यात आले आहे.
5 / 7
मांडले शहराच्या सीमेपासून १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्र बिंदू होता. मांडले हे म्यानमारचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. या शहरात प्रचंड नुकसान भूकंपामुळे झाले आहे. राजधानी नेपीडॉ शहरासहित इतर भागातही इमारती कोसळल्या. रस्ते उखडले गेले आणि इतर वास्तू जमीनदोस्त झाल्या.
6 / 7
जे फोटो इस्रोने शेअर केले आहेत, त्यात मांडले शहरातील प्रमुख स्थळे उदा. स्काय व्हिला, फायानी पॅगोडा, महामुनी पॅगोडा, अनंदा पॅगोडा आणि मांडले विद्यापीठ पूर्णपणे कोसळल्याचे दिसत आहे.
7 / 7
सगाइंग शहरातही मा शी खाना पॅगोडा, इतर धार्मिक मठ आणि इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे इरावदी नदीवरील ऐतिहासिक अवा पूल पूर्णपणे पडला आहे. इरावदी नदीच्या पुराचे पाणी शिरणाऱ्या भागातील मोठ्या भेंगा पडल्याचे दिसत आहे.
टॅग्स :Myanmarम्यानमारEarthquakeभूकंपNatural Calamityनैसर्गिक आपत्तीisroइस्रो