सर्वात मजबूत म्हणून मिरवत होता...! चीन बनवत असलेली गगनचुंबी इमारत पडली; बँकॉकने चौकशी लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:11 IST
1 / 8चीनची उत्पादने म्हणजे चली तो चाँद तक, नहीं तो रात तक... अशी परिस्थिती. एकीकडे चीन रातोरात इमारती, रस्ते बांधून जगाला चकीत करत आहे, तर दुसरीकडे त्यांचीच बांधकामे मजबूत असल्याचे दावे करत असताना पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच आलेल्या मोठ्या भूकंपात चीन बनवत असलेली आणि सर्वात मजबूत इमारत अशी शेखी मिरवत असलेली इमारत पत्त्याच्या इमारतीपेक्षाही जास्त वेगाने कोसळली आहे. 2 / 8 म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी ७.७ तीव्रतेचा भूकंप आला आहे. यामध्ये हजारो इमारती कोसळल्या आहेत. यात १७०० लोकांचा मृत्यू झाला असून साडेतीन हजारांच्या वर लोक जखमी झाले आहेत. अद्याप अनेक मोठमोठ्या इमारतींचा मलबा उपसायचा आहे. यामुळे मृतांचा आकडा भयानक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच दुसरीकडे चीन बांधत असलेली एक इमारत चर्चेत आली आहे. 3 / 8भूकंप बँकॉकमध्ये झाला, पण इज्जत चीनची धुळीस मिळाली आहे. बँकॉक रेल्वेसाठी तेथील सरकार इमारत बांधत होती. ही ३३ मजली इमारत चीनची कंपनी बांधत होती. इमारत पूर्ण बांधूनही झाली होती. बाहेरील काम सुरु होते. चीन सर्वात मजबूत इमारत बांधल्याची शेखी मिरवत होता. परंतू, भूकंपात ही इमारत कोसळली आहे. यामुळे चिनी कंपन्यांनी निर्माण केलेल्या इमारती आता बँकॉक सरकारच्या रडारवर आल्या आहेत. 4 / 8काही सेकंदात ही इमारत कोसळली. इमारतीच्या उंचीपेक्षा कमी उंचीचे धुळीचे लोट उसळले होते. या इमारतीखाली सापडून १७ जणांचा मृत्यू झाला आहे, ३२ जण जखमी झाले आहेत आणि ८३ जण अजूनही बेपत्ता आहेत. यातील बहुतांश लोक हे या इमारतीत काम करणारे कामगार आहेत. इमारतीचा ढिगारा काढून मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. कडक उन्हातही जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.5 / 8थर्मल इमेजिंग ड्रोनने किमान १५ लोक शोधले आहेत, यापैकी काही अजूनही जिवंत असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ढिगाऱ्यातून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 6 / 8बँकॉकमध्ये इतरही अशा अनेक गगनचुंबी इमारती आहेत. या इमारतींची अशी हालत झाली नाही. चिनी इमारत भूकंप का सहन करू शकली नाही. यामुळे या क्षेत्रातील जाणकार आता या इमारतीच्या गुणवत्तेवर सवाल उपस्थित करत आहेत. 7 / 8थायलंडच्या स्टेट ऑडिट ऑफिसने (SAO) इमारत बांधण्याचे कंत्राट एका चिनी कंपनीला सुमारे २ अब्ज बाह्त किंवा सुमारे ४५ दशलक्ष पौंडांना दिले होते. गेल्या तीन वर्षांपासून काम सुरु होते. 8 / 8थायलंडचे उपपंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कारण निश्चित करण्यासाठी तज्ञांच्या समितीला सात दिवसांचा कालावधी दिला आहे.