शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनला आणखी एक धक्का! रशिया म्यानमारमध्ये बंदर विकसित करणार; भारतालाही होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 3:08 PM

1 / 10
रशियाच्या मदतीनं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर दावेई बंदर उभारण्यासाठी म्यानमार सरकारनं रशियाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्यानमारच्या या निर्णयानं चीन नाराज झाला आहे कारण थायलँड सीमेच्या नजीक बंदर उभारण्याकडे चीनचा भर होता.
2 / 10
म्यानमारमध्ये तेल रिफायनरीसह एक विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून बंदर निर्माण योजनेत रशिया गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. ईटीनुसार, चीन गेल्या अनेक वर्षापासून दावेई बंदर विकासासाठी प्लॅन करतोय परंतु त्यांना यश आलं नाही.
3 / 10
म्यानमारच्या तज्ज्ञानुसार, रशियाकडे म्यानमार सरकारचा कल पाहता त्यांना चीनच्या संतापाचा सामना करावा लागू शकतो. म्यानमारच्या पूर्व तटावर दावेई बंदर कंबोडिया, लाओस, थायलँड, व्हिएतनाम आणि चीनसह ग्रेटर मेकांग देशांचे गेट मानलं जाते.
4 / 10
हा पोर्ट थायलँड कंटेनर व्यापारासाठी प्रवेशद्वार बनू शकतो. बँकॉक दावेईपासून ३०० किमी अंतरावर आहे आणि दोन्ही बाजूने काँक्रिट रस्त्याने जोडलेला आहे. संसाधन संपन्न म्यानमारमध्ये चीनवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्यानमार आणि रशिया बंदराच्या विकासावर चर्चा करत आहे.
5 / 10
म्यानमार आणि रशिया यांच्यातील चर्चेत दावेई बंदरावर १० मिलियन टन क्षमता आणि एक तेल रिफायनरी बनवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र रशियाच्या म्यानमारमधील एन्ट्रीमुळे जागतिक बाजारपेठेत वर्चस्व मिळवण्याच्या चीनच्या योजनेला धक्का बसल्याने ते नाराज आहेत.
6 / 10
मात्र या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारताला मोठा फायदा होताना दिसतो, म्यानमार चीनच्या तुलनेत रशियाच्या जवळ जाणं भारताच्या फायद्याचं आहे. म्यानमार भारतासाठी महत्त्वाचं राहिले आहे. भारताने म्यानमारला रशियानिर्मित पाणबुड्याही दिल्या आहेत.
7 / 10
त्याशिवाय श्रीलंकेत भारत आणि रशियन कंपन्यांनी चीन संचालित बंदराजवळ एक विमानतळ निर्मितीसाठी संयुक्त योजना हाती घेतली आहे. म्यानमारनं चीनवरील त्यांचं निर्भरता कमी करण्याकडे भर दिला आहे. त्यासाठी सैन्य पुरवठा आणि विकसित कामांसाठी रशियासोबत संबंध बनवण्यावर भर दिला आहे.
8 / 10
मागील वर्षी म्यानमारनं फुटिरतवादी शक्तींविरोधात वायू सेनेला ताकद देण्यासाठी रशियातून तेल आयात वाढवलं होते. जुंटा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने २०२३ मध्ये मार्च आणि जून या काळात ८ मिलियन बॅरलहून अधिक कच्च्या तेलाची आयात केली.
9 / 10
मागच्या ऑक्टोबर महिन्यात म्यानमारचं सैन्य आणि जातीय समुहातील संघर्ष वाढल्यानंतर म्यानमार रशिया यांच्यातील संरक्षण मदतीच्या प्रक्रियेत वेग आला. म्यानमारच्या नौदलाच्या प्रमुखांनी नौदल उपकरण खरेदीसाठी रशियाचा दौराही केला होता.
10 / 10
रशिया म्यानमारला संरक्षणासाठी लागणाऱ्या साहित्यांचा मोठा पुरवठादार बनला आहे. ज्यात सुखोई, रॉकेट लॉन्चरसह ४०६ मिलियन डॉलरच्या अन्य उपकरणांचा सहभाग आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये म्यानमारमध्ये सत्तांतर झाल्यापासून जुंटा प्रमुख मिन आंग व्हाँईंग यांनी तिनदा रशियाचा दौरा केला होता.
टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाMyanmarम्यानमारchinaचीन