शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जिथं जिवंत जाळले गेले होते १.६० लाख लोक, रहस्य जाणून घ्यायला गेलेलेही कधीच परतले नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 2:20 PM

1 / 11
जगात तर अनेक सुंदर आणि निसर्गरम्य बेट आहेत की जिथं वर्षाचे १२ महिने पर्यटक आवर्जून भेट देत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक निसर्गाचं अद्भूत रुप डोळ्यात साठवून घेण्यासाठी अशा बेटांना भेट देत असतात. पण एक असं बेट पृथ्वीवर अस्तित्वात आहे की जिथं तुमची इच्छा असूनही तुम्ही जाऊ शकत नाही. कारण या देशातलं सरकारचं संबंधित बेट हे धोकादायक आणि असामान्य गोष्टींसाठी ओळख असल्याचं मानतं.
2 / 11
जगातील हे सर्वात रहस्यमय आणि धोकादायक बेट इटलीमध्ये आहे. या बेटाचं नाव पोवेग्लिया आयलँड असं आहे. या बेटावर जाण्यासाठी इटलीच्या सरकारनं बंदी घातली आहे. पोवेग्लिया आयलँडला लोक आयलँड ऑफ डेथ नावानंही ओळखतात. हे बेट इटलीच्या वेनिस आणि लीडो शहराच्या मधून जाणाऱ्या वेनेटियन खाडीमध्ये आहे.
3 / 11
एकेकाळी हे बेट अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य म्हणून ओळखलं जात होतं. बेटावर लोकही मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी भेट देत असत. पर्यटकांचं हे आवडीचं ठिकाण होतं. पण त्यानंतर अशी एक घटना घडली की इटली सरकारला या बेटावर जाण्यापासून जनतेला रोखावं लागलं आणि बंदी घालावी लागली. मग जो जो व्यक्ती या बेटाचं रहस्य जाणून घेण्यासाठी तिथं गेला तो कधीच परतला नाही असंही म्हटलं जातं.
4 / 11
इटलीत १६ व्या शतकात प्लेगच्या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. यामुळे इटलीतील बहुसंख्य लोक या रोगाला बळी पडत होते. संपूर्ण युरोपमध्ये प्लेगच्या साथीचा सर्वाधिक परिणाम इटलीवरच झाला होता. प्लेगची साथ वेगानं पसरत असल्यानं त्यावेळी इटलीच्या सरकारनं प्लेगची लागण झालेल्या रुग्णांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला.
5 / 11
प्लेग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना क्वारंटाइन करणार कसं? असा प्रश्न सरकारसमोर होता. यात सरकारनं प्लेगच्या रुग्णांना याच पोवेग्लिया बेटावर हलविण्याचा निर्णय घेतला. कारण हे एक आयसोलेटेड बेट होतं. त्यामुळे या संपूर्ण बेटाचा क्वारंटाइन स्टेशन म्हणून वापर करण्याचं ठरलं. इतकंच नव्हे, तर ज्या रुग्णांचा मृत्यू होत असे त्यांना याच बेटावर दफन केलं जात होतं.
6 / 11
हळूहळू ही जागा रोगी व्यक्तींनी भरू लागली आणि एकवेळ अशी आली की या बेटावर लाखो लोक प्लेगनं ग्रस्त होते. क्वारंटाइन स्टेशन असल्यामुळे रोगी व्यक्तींना या बेटावर जास्तीत जास्त ४० दिवस राहावं लागत होते. पण परिस्थिती इतकी बिकट झाली होती की एकदा का एका व्यक्तीला या बेटावर नेण्यात आलं की त्याला माघारी परतण्याची संधीच मिळत नसे.
7 / 11
काही इतिहासकार असंही सांगतात की या बेटावर एकाच वेळी १ लाख ६० हजार लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. जेणेकरुन प्लेगनं ग्रस्त मोठ्या संख्येनं रुग्ण एकाचवेळी कमी होऊ शकतील. प्लेगच्या विनाशकारी तांडवानंतर आणखी एका तापाच्या साथीनं एन्ट्री केली होती. त्यामुळे इटलीला पुन्हा एकदा मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं.
8 / 11
नव्या साथीच्या रोगाच्या आजारात मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही याच पोवेग्लिया बेटावर दफन केलं जात होतं. कारण या नव्या तापाच्या साथीवरही त्यावेळी औषध नव्हतं. त्यामुळे कोणताही धोका पत्करण्यास सरकार तयार नव्हतं. त्यामुळे एकेकाळी निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं हे बेट नंतर पृथ्वीवरील जणू नरक बनलं.
9 / 11
लाखो लोकांच्या मृत्यू झालेल्या या बेटावर १९२२ साली एक मनोरुग्णालय देखील उभारण्यात आलं होतं. इथूनच या बेटावर भूत-पिशाज्यच्या घटना समोर येण्यास सुरुवात झाली. या रुग्णालयात राहणाऱ्या स्टाफ आणि रुग्णांनी दावा केली की या बेटावर अनेक भूत आणि आत्मांचं अस्तित्व आहे. हे बेट इतकं रहस्यमय आणि धोकादायक मानलं जाऊ लागलं की लोक दावा करु लागले की इथं रात्रीच्या वेळेस जिवंत व मृत व्यक्तींमधला फरक लक्षात येत नाही.
10 / 11
पोवेग्लिया बेटावर राहणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेस तिथं भयावह आवाज ऐकू येतात. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. एखादा व्यक्ती मानसिक रोगी आणि की त्याच्यावर प्रेत-आत्माचं झपाटलं आहे हे ओळखणं मुश्कील होऊ लागलं होतं असंही डॉक्टर सांगतात. यातच अनेक डॉक्टर्स आणि रुग्णांचे मृत्यू होण्यास सुरुवात होऊ लागली होती. त्यामुळे मानसिक रुग्णालय बंद करण्याची वेळ आली.
11 / 11
अनेक लोक या बेटाचं रहस्य जाणून घेण्यासाठी तिथं जाऊ लागले. पण जो कुणी या बेटावर गेला त्यातील बहुतांश लोक माघारी परतलेच नाहीत. पण जे काही मोजके लोक परतले त्यांनी हे बेट पृथ्वीवरील नरकच असल्याचं सांगितलं. तुम्ही या बेटावर स्वत:च्या मर्जीनं जाऊ शकता पण परत येणं तुमच्या हातात नाही, असंही काहींनी सांगितलं.
टॅग्स :Italyइटली