Nanjing New virus outbreak worst after Wuhan corona crisis returns in china
CoronVirus News: चीनमध्ये कोरोना रिटर्न्स! वुहाननंतरचा सर्वात मोठा उद्रेक; राजधानीसह पाच प्रांतात स्फोट By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 8:12 PM1 / 102 / 10भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला. दररोज ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आला. आता देशातील स्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र ज्या चीनमधून कोरोना पसरला, तिथेच कोरोनाचा स्फोट झाला आहे.3 / 10चीनच्या नानजिंग शहरात कोरोनाचा स्फोट झाला आहे. कोरोनाचा संसर्ग पाच प्रांतांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय बीजिंगलादेखील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. 4 / 10वुहाननंतरचा कोरोनाचा सर्वात मोठा स्फोट अशा शब्दांत चिनी माध्यमांनी नानजिंगमध्ये झालेल्या कोरोना स्फोटाचा वर्णन केलं आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानं चिनी प्रशासनाची चिंता वाढली आहे.5 / 10नानजिंगमधील विमानतळावर २० जुलैला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. आता हा आकडा २०० पर्यंत पोहोचला आहे. नानजिंगच्या विमानतळाहून उड्डाणं करणारी सर्व विमानं ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.6 / 10नानजिंगमध्ये आता व्यापक पातळीवर कोरोना चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील ९३ लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 7 / 10मास्क घाला, एक मीटरचं अंतर ठेवा आणि बोलणं टाळा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नानजिंग शहर आणि पाच प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट पसरला आहे. विमानतळावरील गर्दीच्या माध्यमातून डेल्टाचा प्रसार झाला आहे.8 / 10१० जुलैला नानजिंग विमानतळावर कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. रशियाहून आलेल्या विमानात काम केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला. या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे नियम पाळले नसल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.9 / 10कोरोनाचा प्रादुर्भाव आता १३ शहरांमध्ये पसरला असून त्यात राजधानी बीजिंग आणि चेंगदूचाही समावेश आहे. कोरोनाचा स्फोट प्राथमिक टप्प्यात असून तो नियंत्रणात आणता येऊ शकतो, असं तज्ज्ञांनी ग्लोबल टाईम्सला सांगितलं.10 / 10नानजिंगमधील ७ कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिनी लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात कितपत प्रभावी आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications