nasa Astronaut Christina Koch watches sunrise 16 times in single day
'ती' दररोज 16 वेळा पाहते सूर्योदय; पण कसा? By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 3:49 PM1 / 9अमेरिकेची अंतराळ संस्था नासामध्ये कार्यरत असणाऱ्या क्रिस्टिना कोच यांच्या नावावर सर्वाधिक दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे.2 / 9पृथ्वीपासून ४०८ किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रिस्टिना दिवसातून १६ वेळा सूर्योदय पाहतात. स्पेस स्टेशन सतत पृथ्वीभोवती फिरत असल्यानं जवळपास दर ९० मिनिटांनी त्यांना सूर्योदय दिसतो. 3 / 9ऑक्टोबर २०१९ मध्ये क्रिस्टिना यांनी स्पेसवॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत दुसऱ्या अंतराळवीर जेसिका मीर होत्या. कोणत्याही पुरुष अंतराळवीर सहकाऱ्याविना महिलांनी केलेला हा पहिला स्पेसवॉक ठरला. 4 / 9अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव करणारी महिला अंतराळवीर होण्याचा मानदेखील लवकरच क्रिस्टिना यांना मिळणार आहे. 5 / 9२०१७ मध्ये नासाच्या पेगी व्हिटसन अंतराळात २८९ दिवस ५ तास १ मिनिटं वास्तव्य करुन परतल्या. क्रिस्टिना फेब्रुवारीत पृथ्वीवर येतील. त्यावेळी त्यांनी अंतराळात ३२८ दिवस वास्तव्य केलेलं असेल. 6 / 9क्रिस्टिना १४ मार्च २०१९ रोजी अंतराळात गेल्या. त्यांची मोहीम ६ महिन्यांची होती. मात्र या मोहिमेचा कालावधी वाढवण्यात आला. 7 / 9अंतराळात इतके दिवस वास्तव्य करण्याची संधी मिळणं हा आपला सन्मान असल्याचं क्रिस्टिना म्हणतात. 8 / 9क्रिस्टिना ६ फेब्रुवारी २०२० रोजी पृथ्वीवर परततील. तोपर्यंत त्या अनेकदा स्पेसवॉक करतील. 9 / 9स्पेस स्टेशनमध्ये मोकळ्या वेळेत क्रिस्टिना अंतराळ आणि पृथ्वीचे फोटो काढतात. ४० वर्षांच्या क्रिस्टिना यांची २०१३ मध्ये नासात निवड झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications